ETV Bharat / state

Udayanraje Watched Pushpa The Rise : खासदार उदयनराजे भोसले 'पुष्पा'वर फिदा ! - अभिनेता अल्लू अर्जून

आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजेंचा ( MP Chhatrapati Udayanraje Bhosale ) अंदाजही काहीसा हटके असतो. त्यांच्या मनात कधी काय येईल, हे सांगता येणे मुश्किल. नुकतेच त्यांनी अचानकपणे चित्रपटगृहात जाऊन 'पुष्पा द राइज' चित्रपट ( Udayanraje Watched Pushpa The Rise ) पहिला. त्यानंतर या चित्रपटाचे कौतुकही केले.

उदयनराजे
उदयनराजे
author img

By

Published : Jan 6, 2022, 8:08 PM IST

Updated : Jan 6, 2022, 11:00 PM IST

सातारा : भाजपचे राज्यसभा सदस्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा ( MP Chhatrapati Udayanraje Bhosale ) अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा सहसा अंदाज लागत नाही. दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक साताऱ्याच्या राजलक्ष्मी चित्रपटगृहात जाऊन त्यांनी निवडक मित्रांसोबत जाऊन 'पुष्पा द राइज' या चित्रपटाचा आनंद ( Udayanraje Watched Pushpa The Rise ) लुटला.

खासदार उदयनराजे भोसले 'पुष्पा'वर फिदा !

निवड कार्यकत्यांसोबत घेतला आनंद

विशेष म्हणजे सहसा करमणूकीच्या कार्यक्रमांना प्रारंभ करुन देण्यापुरतेच हजेरी लावणाऱ्या उदयनराजेंनी संपूर्ण चित्रपट पाहिला आणि या कलाकृतीचा आनंद लुटला. साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरला ( Rajlakshmi Theater Satara ) 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री या चित्रपटगृहाला भेट दिली. त्यांच्यासोबत पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, डाॅ. चंद्रशेखर घोरपडे असे निवडक मित्र व कार्यकर्ते होते.

उदयनराजेंनी केले कौतूक

'पुष्पा द राइज' चित्रपट पाहिल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी या चित्रपट कलाकृतीचे काैतुक ( Udayanraje Appreciated Pushpa The Rise ) केले. तसेच राजलक्ष्मी थिएटरलाही शुभेच्छा दिल्या. दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जून ( Actor Allu Arjun ) आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Actress Rashmika Mandanna ) यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. या चित्रपटाने 400 कोटीच्यावर बाॅक्स आॅफिसवर उडी घेतलेली आहे. या दक्षिणात्य चित्रपटाने मोठा धुमाकूळ घातला आहे. तेलगूशिवाय हिंदी भाषेसह चार भाषात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाण्यासह, संवाद आणि स्टोरीवरती अनेकजण फिदा झालेले आहेत. आता यामध्ये उदयनराजे भोसले हेही पुष्पावर चांगलेच फिदा झालेले पहायला मिळाले.

उदयनराजे यांचे चित्रपट प्रेम

राजकीय परिणामांची तमा न करता अनेकदा उलटसुट परंतू स्वत:च्या मनाप्रमाणे भुमिका घेणारे उदयनराजे भोसले हे वादळी राजकीय व्यक्तिमत्व आहे. स्वच्छंदी स्वभावामुळे ते सर्वसामान्यांच्या विशेषत: तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. केवळ सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यभर आणि देशभर त्यांचे फाॅलोअर्स पसरले आहेत. माध्यमांना काय लागतं याचा अचूक अंदाज बांधणारे उदयनराजे यांचे हे चित्रपटप्रेम प्रसारमाध्यमांपासून लपून राहिलेले नाही.

Last Updated : Jan 6, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.