ETV Bharat / state

टाळेबंदी नुकसानीचे, केंद्रांने रोख स्वरुपात मदत करावी - पृथ्वीराज चव्हाण - सातारा शहर बातमी

टाळेबंदी केली तर सामान्यांवर नुकसान सोसण्याची वेळ येईल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी हा पर्याय असला तरी तो स्वीकारणे नुकसानीचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Apr 1, 2021, 10:37 AM IST

Updated : Apr 1, 2021, 11:08 AM IST

कराड (सातारा) - टाळेबंदी केली तर सामान्यांवर नुकसान सोसण्याची वेळ येईल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी हा पर्याय असला तरी ती स्वीकारणे नुकसानीचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

बोलताना पृथ्वीराज चव्हाण

देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सरकार मदत करायला तयार नसेल तर काय करायचं, असा सवाल करत केंद्र सरकारने हाफकिनला कोरोना लस उत्पादनासाठी परवानगी द्यावी. भारत बायोटेकने साधन सामुग्री आणि लसीचे तंत्र पुरवावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पहिल्या टप्प्यात खूप नुकसान झाले आहे. दुसर्‍या टप्प्यानेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे या संदर्भात योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. तर काही केलेल्या नाहीत. टाळेबंदी करू नये व जर केला तर परदेशाप्रमाणे थेट नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा करावे. या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. टाळेबंदी केली तर अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही. टाळेबंदी हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी असते. जीव वाचवायचा की रोजगार हा प्रश्न असला, तरी जीव महत्त्वाचा आहे. टाळेबंदी करायची असेल, तर पूर्वसूचना द्यावी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाणांनी केली.

केंद्र सरकारने लोकांत्या खात्यात पैसे जमा करावेत

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. नागपूर, अमरावतीत आलेला व्हायरस आफ्रिकेतील आहे की कुठला हे तज्ज्ञ तपासत आहेत. अमेरिकेत प्रत्येक बेरोजगाराला महिन्याला 1 हजार 400 डॉलर, इंग्लंडमध्ये 2 हाजर 500 पौंड दिले आहेत. सिंगापूरमध्ये 23 मिलियनची तरतूद करण्यात आली. थायलंडमध्ये 6 महिन्यांसाठी 50 टक्के पगार देण्यात येत आहे. त्याप्रमाणे केंद्र सरकारनेही आपल्या तिजोरीतून लोकांच्या खात्यात पैसे जमा करावेत, असेही ते म्हणाले.

आधी झालेल्या टाळेबंदीत भारतात 3 कोटी लोक दारिद्य्र रेषेत गेले आहेत. लाखो लोक कायमस्वरुपी बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारने त्यांना मदतीचा हात द्यावा. थेट पैसे दिले, तरी देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही. सध्या कोरोनाविरूध्द युध्दच सुरू आहे. कोरोना गल्लीबोळात आहे. कोरोनाविरूध्द लढण्यास सरकार तयार नसेल तर काय करायचे, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

हेही वाचा - बॉम्बच्या साह्याने रान डुक्कराची शिकार करणार्‍या चौघांना अटक, एक फरार

Last Updated : Apr 1, 2021, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.