सातारा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: मरळी येथे येऊन ( MLA Bhaskar Jadhav Criticizes Shambhuraj Desai ) लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू म्हणून शंभूराज ( Grandfather was a Great Grandson Turned Thief ) देसाईंना मंत्रिपद आणि लाल दिव्याची गाडी दिली. त्यांनीच विश्वासघात करीत पाठीत खंजीर खुपसला. तुमचे आजोबा थोर होते, पण तुम्ही चोर निघाला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे उपनेते आमदार भास्करराव जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाईंवर केली.
मंत्रीपद देणार्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला पाटणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच, सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाईंना मंत्रिपद दिले. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यानंतर आमच्या देसाई घराण्याला 37 वर्षांनंतर उद्धवसाहेबांनी मंत्रिपदाचा मान दिला. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला.
शंभूराज देसाईंना इतिहास चोर म्हणून करेन उल्लेख तुम्ही शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला, बाळासाहेबांचे नावही चोरले. त्यामुळे तुमच्या नावाचा इतिहास लिहिताना चोर म्हणून लिहिला जाईल. आपले आजोबा थोर पुरुष होते. हेदेखील तुम्ही विसरला. महाराष्ट्राच्या आजवरच्या गृहमंत्र्यांचा इतिहास पाहिला, तर दिवंगत बाळासाहेब देसाईं यांच्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा आदराने उल्लेख होतो. त्यांच्याच नातवाचा विश्वासघात जनतेने 37 वर्षांनंतर पाहिला.
पाटणची जनता भगवा फडकवेल शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, सर्वात आधी मी आणि शंभूराज एकनाथ शिंदेबरोबर गेलो. त्यामुळे यांची ओळख चोरवाटा दाखविणारे, अशी झाली असल्याचा टोला आमदार जाधव यांनी मारला. पुढे ते म्हणाले, येत्या पाटण विधानसभा निवडणुकीत गद्दारापुढे कोणताही उमेदवार उभा असू द्या, पाटणची जनता त्यालाच निवडून देऊन शंभूराज देसाईंना पराभवाची धूळ चारल्याशिवार राहणार नाही. विधानसभेला उमेदवार कोणीही असो आपण शिवसेनेचा, उद्धव साहेबांचा भगवा फडकवायचाच. जिथे माझी मदत लागेल तिथे मी करेन. तुम्हाला दुसरा आमदार मिळेपर्यंत ती तुमचा आमदार म्हणून निश्चितपणे काम करेन.
भाजपने शिवसेना फोडली महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न, लोकांच्या अडचणी आहेत. मात्र, मूळ प्रश्न, विधायक मुद्दे, महाराष्ट्राची वैचारिकता, भूमिकेचा विचार न करता टीका करून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. देशाची संस्कृती, संस्कार आणि संसार भाजपने मोडला आहे. भारतीय जनता पार्टीला सत्तेचा माज आला आहे. शिवसेना फोडण्याचे कामही भाजपनेच केले आहे. या बाबी लोकांनी विसरू नये. सध्याचे सरकार राज्याला स्थिरता देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संघटीत राहून उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ताकद उभी करूया, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले.