ETV Bharat / state

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे पोलिसांना स्पष्ट आदेश - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सारोळा चेकपोस्ट विजीट

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरील मालखेड येथील चेक नाक्याची परवा पहाणी केल्यानंतर त्यांनी सातारा व पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीवरील सारोळा येथील चेक नाक्यावरील कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्ताची त्यांनी पाहणी केली.

Minister shambhuraj desai visit sarola check post visit
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सारोळा चेकपोस्ट विजीट
author img

By

Published : Apr 25, 2021, 10:48 PM IST

Updated : Apr 25, 2021, 10:54 PM IST

सातारा - कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सारोळा चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सक्त सूचना केल्या.

पुण्याच्या अधीक्षकांकडुन घेतली माहिती -

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरील मालखेड येथील चेक नाक्याची परवा पहाणी केल्यानंतर त्यांनी सातारा व पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीवरील सारोळा येथील चेक नाक्यावरील कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्ताची त्यांनी पाहणी केली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. सारोळा चेकपोस्टवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिली. त्यानंतर देसाईंनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांना चेकनाक्यावरून फोन लावत पुणे हद्दीवरील चेक नाक्याचीही माहिती घेतली.

जनतेनेही स्वत:ची व पोलिसांची काळजी घेतली -

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात जिल्ह्याच्या नाकाबंदीची पोलिस खात्याकडून योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परवा रात्री आठ वाजल्यापासून राज्यातील पोलीस दल अलर्ट आहे. संपूर्ण राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात असल्याने वैद्यकीय, दुःखद घटनेचे किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे. जनतेनेच आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेवून प्रवास करावा.पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेनेही त्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी. पोलीसांच्या प्रकृतीची काळजी शासन घेत आहे. जनतेनेही स्वत:ची त्यांच्या कुटुंबाची व पोलीसांची काळजी घेतली पाहिजे.

Last Updated : Apr 25, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.