सातारा - छत्रपती घराण्याची सातारा ही राजधानी आहे. उदयनराजे छत्रपती घरण्याचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या स्टाईला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यांचे बिनधास्त वागणे असल्याने अनेकांना ते आवडतात. गुरुवारी जलमंदिर या त्यांच्या निवासस्थानी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान बिनधास्त उदयनराजे, तर गृहमंत्री देसाई हे वाकून नमस्कार करताना पहिला मिळाले, हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सातार्यातील जलमंदिर हे खासदार छत्रपती उदयनराजेंचे निवासस्थान आहे. देश-विदेशातील अनेकजण या जलमंदिराला भेट देवून शिवकालीन वास्तूंचे दर्शन घेतात. तसेच तेरावे वंशज म्हणून उदयनराजेंना मुजराही करतात. उदयनराजे हे विनोदी स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या करारी बाण्याला सर्वच विनोद शोभून दिसतात. गृहराज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शंभूराज देसाई गुरुवारी जलमंदिरात आले होते. बालपणीचे मित्र असले तरी एकमेकांचा आदर करुन राजकारणात यशस्वी होणारे हे दोन मित्र जेव्हा भेटतात, तेव्हा विनोद ओसंडून वाहत असतो. जलमंदिरात गृहराज्यमंत्री आल्यानंतर उदयनराजेंनी शाल, श्रीफळ व कंदी पेढे देवून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर गप्पांचा फड रंगला. विकासकामांवरही यावेळी चर्चा झाली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना गृहराज्यमंत्र्यांचा मुजरा..? - शंभूराज देसांईचा उदयनराजेंना मुजरा
गृहराज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शंभूराज देसाई गुरुवारी जलमंदिरात आले होते. गृहराज्यमंत्री आल्यानंतर उदयनराजेंनी शाल, श्रीफळ व कंदी पेढे देवून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर गप्पांचा फड रंगला. विकासकामांवरही यावेळी चर्चा झाली.