ETV Bharat / state

श्रमिकांच्या जीवासाठी 'यूपी, एमपी'पर्यंत धावली सामान्यांची लालपरी... - st bus news

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा काळात अनेक राज्यातील कामगार अडकून पडले आहेत. मात्र, या कामगारांना सुरक्षीतपणे त्यांच्या गावी पोहोचवले आहे. सातारा जिल्ह्यातून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील कामगारांनी लालपरीने पोहोचवण्यात आले.

satara
साताऱ्यातून परप्रांतीय कामगारांना एसटीने सोडले
author img

By

Published : May 14, 2020, 9:00 PM IST

सातारा - गेल्या 72 वर्षांत कधी नव्हे ते पहिल्यांदाच कोरोना या जागतिक संकटाने प्रत्येक डेपोत शेकडो गाड्या चक्काजाम होऊन थांबल्या आहेत. मात्र, या परिस्थितीतही शासनाने इतर राज्यातील कामगारांना सुरक्षीतपणे त्यांच्या गावी पोहोचवले आहे. सातारा जिल्ह्यातून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील कामगारांनी लालपरीने पोहोचवण्यात आले.

satara
साताऱ्यातून परप्रांतीय कामगारांना एसटीने सोडले

'गाव तिथे एसटी' प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन 1 जून 1948 पासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस धावते आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने इतर राज्यातील श्रमीक सुरक्षीतपणे त्यांच्या गावी पोहोचावेत म्हणून एसटी ला हाक दिली. एसटीचे सर्व अधिकारी, चालक, वाहक या मोहिमेसाठी तयार झाले. सातारा जिल्ह्याचे एसटीचे प्रमुख सागर पळसुले यांनी आदेश दिले आणि श्रमिकांना घेऊन एसटीने सुरक्षीतपणे त्यांना त्यांच्या प्रांतात, गावी नेऊन सोडले.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे श्रमीक रेल्वे गेली. जिल्ह्यातील अकरा तालुके आणि मोठ्या गावातील सर्व श्रमिकांना विना मोबदला सातारा रेल्वे स्थानकावर सोडले. कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता एक सामाजिक दायित्व म्हणून मोठ्या उत्साहात चालक- वाहकांनी ही जबादारी फत्ते केली. तामिळनाडूतील सेलम असेल वा उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्यप्रदेशातील सुलतानपूर अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व सामान्यचं भूषण असलेली एसटी तिथे गेली. अजूनही काही गाड्या बाहेरच्या राज्यात जायला सज्ज झाल्याचे पळसुले यांनी सांगितले.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडाच्या सातारा विभागामार्फत 7 मे रोजी सातारा ते पॉडेचरी (23 प्रवाशी), सातारा ते राजस्थान येथील राणिवाडा ( 23), वडूज -राणिवाडा (22) असे एकूण 68 प्रवाशी एसटी बसेसने सोडण्यात आले. 9 मे रोजी सातारा-वडूज ते भंडारा, मेढा ते उत्तर प्रदेश (वाराणसी) असे एकूण 45 प्रवाशी सोडण्यात आले. वडूज ते कर्नाटक (हल्ल्याळ), कराड ते तामिळनाडू (शेलम) 9 एसटी बसेस सोडण्यात आल्या. यातून 201 प्रवासी गेले. सातारा ते मध्यप्रदेश (सुलतानपूर) येथे 23 प्रवाशी सोडण्यात आले आहेत. तसेच महामंडळाच्या सातारा विभागामार्फत हैद्राबाद व गुलबर्गा येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना सोडण्यात आले आहे.केंद्र सरकारने परवानगी देताच शेकडो लोकांना रेल्वे आणि बसने सोडण्याची तत्परता शासनाने दाखवली. महाराष्ट्र कोणत्याही प्रसंगात आपलं सर्वस्व पणाला लावून झुंजतो हे या कोरोनाच्या जागतिक संकटातही अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.