सातारा- येथील शिवाजीनगर रस्त्यावर आज एकाने जमिनीच्या वादातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- रणजीचा आजपासून रंगणार थरार, 'या' नवीन संघाकडे सर्वांचे लक्ष!
बंदुकीच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. संतोष जयसिंग शिंदे (वय 38, रा. प्लाॅट नंबर 5 शिवाजीनगर, शाहूपुरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष मुंबई येथे इस्टेट ब्रोकर म्हणून काम करत होता. अधुन-मधून साताऱ्यातील घरी तो यायचा. आज सकाळी घरातून तो बाहेर पडला. त्यानंतर घरापासून सुमारे २०० मिटर अंतरावर अश्वमेध बंगल्याच्या जवळील रस्त्यावर त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. काॅलनीतील युवकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्नालयात दाखल केले. मात्र, तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून त्याने ही आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी शाहूपुरी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.