ETV Bharat / state

Prithviraj Chavan : राजकीय टीका करा, मात्र समाजविघातक वक्तव्य खपवून घेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट इशारा - संभाजी भिंडे यांच्यावर गुन्हा दाखल

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. संभाजी भिंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच, राजकीय टीका करा, आम्ही उत्तर देऊ. परंतु, समाजविघातक वक्तव्ये, कृती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan
author img

By

Published : Jul 30, 2023, 10:34 PM IST

सातारा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, याबद्दल समाधान आहे. परंतु, त्यांना अटक होईल, असे आपल्याला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. राजकीय टीका करा, आम्ही उत्तर देऊ. पण, समाजविघातक वक्तव्य आणि कृत्य सहन केले जाणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

राजकीय टीकेला उत्तर देऊ : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राजकीय टीका करा. त्याला आम्ही उत्तर देऊ. परंतु, समाजविघातक वक्तव्य आणि कृत्य सहन केले जाणार नाही. आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भिडे यांच्यावर कारवाई झाली, याबद्दल समाधान आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अटक केली जाईल, असे आपल्याला वाटत नाही. तसेच एखादा व्यक्ती वारंवार गुन्हा करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र, सरकार अशा प्रवृत्तीला पाठिशी घालत असल्याचे दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.

मणिपूरवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. यांच्या कार्यालयीन जी मेलवर अकाऊंटवर शनिवारी रात्री पावणे एकच्या सुमारास हा धमकीचा ईमेल आला होता. त्यामुळे आज सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांच्या सुक्षेत वाढ केली होती. धमकीच्या ईमेल संदर्भात पोलीस त्यांचे काम करत आहेत. त्यावर मी बोलणार नाही. परंतु, वादग्रस्त वक्तव्य करून मणिपूरमधील हिंसाचारावरून लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

संभाजी भिडे काय म्हणाले होते महात्मा गांधींबद्दल? संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांचे वडिल मुस्लिम जमीनदार होते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभरात काँग्रेसने निषेध नोंदवला होता. तसेच राजकीय वर्तुळात देखील भिडे गुरुजींच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापले होते.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; भिडेंविरुद्ध फडणवीसांचा कारवाईचा इशारा
  2. Prithviraj Chavan Threat Email : पृथ्वीराज चव्हाणांना धमकीचा ईमेल; संभाजी भिडेंच्या अटकेची केली होती मागणी
  3. PM Modi Pune Visit : PM मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर; मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.