ETV Bharat / state

ग्रामीण महाआवास अभियानाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील - Balasaheb Patil programme

सातारामध्ये महाआवास योजनेसंदर्भात कार्यशाळा झाली. यावेळी योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. या कामामध्ये सरपंचाचांचा सहभाग महत्वाचा असल्याचे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले. तसेच निवाऱ्याबरोबर रोजगारनिर्मितीही महत्वाची असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाआवास अभियानात पात्र लाभार्थींना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे गाठा पालकमंत्री बाळासाहेब पाटील
महाआवास अभियानात पात्र लाभार्थींना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे गाठा : बाळासाहेब पाटील
author img

By

Published : Dec 12, 2020, 12:11 PM IST

सातारा : गरजुंना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देत ग्रामीण महाआवास अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे. जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध रहावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

महाआवास अभियान कार्यशाळा

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात महाआवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. याप्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपस्थित होते.
रखडलेलीव कामे मार्गी लावा
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवास योजनांची कामे रखडली आहेत. या कामांना महाआवास अभियानांतर्गत गती द्यावी असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शहराजवळ असलेल्या गावांमध्ये घरकुल योजनेंतर्गत जमिनी खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढला पाहिजे. घरकुल योजना राबविण्यास अडचणी येत असतील तर त्या सर्व विभागांनी एकत्र बसून सोडवाव्यात. घरकुल योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करा. यामध्ये सरपंच, पंचायत सभापती, सदस्य यांचा समावेश करावा. मंजूर व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्य व केंद्र पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यासाठी राज्यशासन पाठीशी आहे.

सरपंचांचा सहभाग महत्वाचा - शंभुराज देसाई

ज्यांना घरकुले नाहीत अशांना 2022 पर्यंत घरकुले देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे या कामाला प्राधान्य द्यावे. या अभियानात प्रत्येक गावच्या सरपंचांचा सहभाग घ्यावा. सातारा जिल्हा परिषद विविध योजना राबविण्यात नेहमीच राज्यात आघाडीवर राहिली आहे. महाआवास अभियानसुद्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
रोजगार निर्मितीही महत्वाची - श्रीनिवास पाटील
अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असून घरकुलांबरोबर रोजगार निर्मितीवर भर द्यावा, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, विनय गौडा आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी केले. या कार्यशाळेत अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी अन्य यंत्रणाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.