सातारा - कोरोना विरुद्धच्या लढाईत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या घरातच थोपवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे आवाहन वजा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिला.
वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता त्याला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत टाळेबंदीचे आदेश दिले आहेत. 22 ते 26 जुलै दरम्यान अंशत: टाळेबंदी राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी जिल्हावासियांना हे आवाहन केले आहे.
त्या म्हणाल्या, ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी, टाळेबंदीच्या आदेशाचा भंग करणांवर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी (दि. 18 जुलै) 8 हजार 348 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. शनिवारपर्यंत रज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाख 937 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 65 हजार 663 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 23 हजार 377 सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.