ETV Bharat / state

Heavy Rains In Satara : आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर आले पुराचे पाणी - कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा या ठिकाणी चोवीस तासात विक्रमी 307 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.

Heavy Rains In Satara
Heavy Rains In Satara
author img

By

Published : Jul 19, 2023, 5:09 PM IST

सातारा : मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे 24 तासात 307 मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, महाबळेश्वर-पाचगणी आणि कुंभरोशी मार्गाला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

चिपळूण-कराड वाहतूक ठप्प : कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत. लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांसाठी रासायनिक पदार्थांची वाहतूक करणारी अवजड वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. तसेच कराडहून कोकणात भाजीपाला घेऊन जाणार्‍या वाहनांना देखील पावसाचा, दरड कोसळल्याचा फटका बसला आहे. सध्या प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

आंबेनळी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे मंगळवारी रात्री दरड कोसळून रस्त्यावर आली होती. ही दरड हटविण्याचे काम सकाळी हाती घेण्यात आले. परंतु, सकाळी दलिब टोक या ठिकाणीही दरड कोसळल्याने महाबळेश्वर-पोलादूर मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढला आहे.

कोयनेच्या पाणीसाठ्यात तीन टीमएमसीने वाढ : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. मुसळधार पावसाने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 15 तासात कोयना धरणातील पाणीसाठा 3 टीएमसीने वाढला आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद 44 हजार 305 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 31.10 टीएमसी पाणीसाठा आहे.

नवजामध्ये विक्रमी पाऊस : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा या क्षेत्रात चोवीस तासात उच्चांकी 307 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल महाबळेश्वरमध्ये 275 तर कोयनानगरमध्ये 158 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तिन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 50 हजार क्युसेकपर्यंत पोहोचली आहे. कोयनानगर परिसरातील काडोली-संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - Maharashtra Monsoon Update : जिल्ह्यातील नद्या ओढ्याना आला पूर; रेल्वे वाहतूकही खोळंबली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.