ETV Bharat / state

कराड पंचायत समितीमधील मानापमान नाट्य थांबेना; यशवंतरावांचा अवमान होण्याचा धोका

पंचायत समिती सदस्यांना अधिकारी नीटपणे योजनांची माहिती देत नाहीत, असा आरोप उपसभापती सुहास बोराटे यांनी शनिवारच्या सभेत केला. या प्रश्नावरून त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर मी राजीनामा देतो, असे आव्हान त्यांनी भर सभेत दिले. सदस्यांचा सन्मान राखला जात नसेल, तर जिल्हा परिषदेची एकही योजना पंचायत समिती स्तरावर राबविली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

कराड पंचायत समिती
author img

By

Published : Nov 18, 2019, 2:10 AM IST

सातारा - कराड पंचायत समितीच्या मासीक सभांमध्ये अलिकडे आक्रीतच घडत आहे. क्षुल्लक कारणावरून पंचायत समितीचे काही सदस्य अधिकार्‍यांना धारेवर धरु लागले आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर मागताना थेट स्वत:च्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अन्यथा अधिकार्‍याने राजीनामा द्यावा, अशी भाषा भर सभेमध्ये करू लागले आहेत. शनिवारी झालेल्या मासिक सभेत असाच प्रकार घडला. एका सदस्याने भर सभेत तुम्ही तरी राजीनामा द्या, अथवा मी राजीनामा देतो, असे आव्हान दिले. त्यामुळे ती सभा चांगलीच गाजली. परंतु, अशा प्रकारामुळे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचा अवमान होऊ शकतो, याचे भान सदस्य आणि अधिकार्‍यांनी राखायला हवे. त्यावर समन्वय हाच एकमेव उपाय आहे.

पंचायत समिती सदस्यांना अधिकारी नीटपणे योजनांची माहिती देत नाहीत, असा आरोप उपसभापती सुहास बोराटे यांनी शनिवारच्या सभेत केला. या प्रश्नावरून त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर मी राजीनामा देतो, असे आव्हान त्यांनी भर सभेत दिले. सदस्यांचा सन्मान राखला जात नसेल, तर जिल्हा परिषदेची एकही योजना पंचायत समिती स्तरावर राबविली जाणार नाही, असेही ते म्हणाले. यावरून सभेतील वातावरण तापले. सभापती फरिदा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू होती. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, जिल्हा आरोग्य अधिकारीही उपस्थित होते.

हेही वाचा - शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर

कराड पंचायत समितीच्या सलग तिसर्‍या मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी पशुसंवर्धन विभागाला धारेवर धरले. आम्हाला योजना माहित नसेल आणि आम्ही सुचविलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल, तर जिल्हा परिषद योजनांचे फॉर्म आम्हाला कशासाठी देता, असा सवाल सदस्य रमेश चव्हाण यांनी केला. जिल्हा परिषदेच्या योजना राबविताना पंचायत सदस्यांना विचारात घेतले जात नसेल, तर जिल्हा परिषदेच्या योजना राबवायच्या तरी कशाला, असे सदस्य अ‍ॅड. शरद पोळ म्हणाले. जिल्हा परिषदेच्या योजना राबविल्या जाऊ नयेत, असा ठराव करण्याची सूचना सुध्दा पोळ यांनी केली.

हेही वाचा - अयोध्या प्रकरण : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड दाखल करणार पुनर्विचार याचिका

सदस्यांनी ज्या-ज्या लाभार्थींचे फॉर्म दिले, ते जर मंजूर झाले नाहीत, तर मी पशुसंवर्धन विभागाला सोडणार नाही, असा इशारा उपसभापती सुहास बोराटे यांनी दिला. पशुसंवर्धन विभागाचे कामकाज कसे चालते, कोणाला लाभ दिला जातो, हे सगळे मला माहिती आहे. या विभागाची मनमानी मी चालू देणार नाही, असेही ते म्हणाले. त्यावर खुलासा करताना पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. टी. पाटील म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती सर्व सदस्यांना दिलेली आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. परंतु, उपसभापती बोराटे यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले, तुम्ही पत्र दिलेले नाही. दिले असेल, तर मी राजीनामा देतो, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या. मग डॉ. पाटील यांनीही प्रतिआव्हान देत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. ही सभेतील तत्कालिन आणि जोशपूर्ण चर्चा असली, तरी पंचायत समिती सदस्यांना अधिकार्‍यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्नही निर्माण होतो. गेली अनेक वर्षे कराडच्या पंचायत समितीमध्ये सदस्य आणि अधिकार्‍यांचे मानापमान नाट्य सुरू आहे. आजपर्यंत ते थांबले नसल्याचा पुरावाच शनिवारच्या सभेत मिळाला. ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या सभेत एका सदस्याने अधिकार्‍याबद्दल शिवराळ भाषा वापरली होती. त्याचीही चर्चा कराड पंचायत समितीच्या वर्तुळात आहे.

हेही वाचा - 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेला कोल्हापुरात तरुणांचा मोठा प्रतिसाद

2004 साली एका सभेत एका सदस्याने महिला अधिकार्‍याबाबत भर सभागृहात 'गुण गाईचे आणि वाण घोड्याचे', असा शब्दप्रयोग केला होता. त्यावेळी हा प्रकार पोलीस ठाण्यात जाण्यापर्यंत निघाला होता. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अन्य सदस्यांनी संबंधित सदस्याला महिला अधिकार्‍याची माफी मागायला लावून त्या घटनेवर पडदा टाकला होता. कराड पंचायत समितीच्या ज्या सभागृहात मासीक सभा होतात, त्या सभागृहाला स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह म्हणून ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान आणि राजकारणातील त्यांचे अलौकीक कार्य पाहता ज्यांच्या नावाने राजकारण, समाजकारण केले जाते, त्या स्व. चव्हाण साहेबांचे नाव असलेल्या सभागृहाचा लौकीक जपण्याची जबाबदारी आणि भानसुध्दा सदस्यांनी जपणे तितकेच गरजेचे आहे. हे भान सदस्यांना केव्हा येणार, एवढाच प्रश्न आहे.

Intro:कराड पंचायत समितीच्या मासिक सभांमध्ये सदस्य अधिकार्‍यांना टार्गेट करू लागले आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर मागताना थेट स्वत:च्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अन्यथा अधिकार्‍याने राजीनामा द्यावा, अशी भाषा भर मिटींगमध्ये करू लागले आहेत. अशा प्रकारामुळे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचा अवमान होऊ शकतो, याचे भान सदस्य आणि अधिकार्‍यांनी राखायला हवे..
Body:कराड (सातारा) - कराड पंचायत समितीच्या मासिक सभांमध्ये अलिकडे आक्रीतच घडत आहे. क्षुल्लक कारणावरून पंचायत समितीचे काही सदस्य अधिकार्‍यांना टार्गेट करू लागले आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर मागताना थेट स्वत:च्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अन्यथा अधिकार्‍याने राजीनामा द्यावा, अशी भाषा भर मिटींगमध्ये करू लागले आहेत. शनिवारी (दि. 16) झालेल्या मासिक सभेत असाच प्रकार घडला. एका सदस्याने भर सभेत तुम्ही तरी राजीनामा द्या, अथवा मी राजीनामा देतो, असे आव्हान दिले. त्यामुळे ती सभा चांगलीच गाजली. परंतु, अशा प्रकारामुळे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचा अवमान होऊ शकतो, याचे भान सदस्य आणि अधिकार्‍यांनी राखायला हवे. त्यावर समन्वय हाच एकमेव उपाय आहे.
   पंचायत समिती सदस्यांना अधिकारी नीटपणे योजनांची माहिती देत नाहीत, असा आरोप उपसभापती सुहास बोराटे यांनी शनिवारच्या सभेत केला. या प्रश्नावरून त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर मी राजीनामा देतो, असे आव्हान त्यांनी भर सभेत दिले. सदस्यांचा सन्मान राखला जात नसेल, तर जिल्हा परिषदेची एकही योजना पंचायत समिती स्तरावर राबविली जाणार नाही, असेही ते म्हणाले. यावरून सभेतील वातावरण तापले. सभापती सौ. फरिदा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू होती. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, जिल्हा आरोग्य अधिकारीही उपस्थित होते.
   कराड पंचायत समितीच्या सलग तिसर्‍या मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी पशुसंवर्धन विभागाला टार्गेट केले. आम्हाला योजना माहित नसेल आणि आम्ही सुचविलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल, तर जिल्हा परिषद योजनांचे  फॉर्म आम्हाला कशासाठी देता, असा सवाल सदस्य रमेश चव्हाण यांनी केला. जिल्हा परिषदेच्या योजना राबविताना पंचायत सदस्यांना विचारात घेतले जात नसेल, तर जिल्हा परिषदेच्या योजना राबवायच्या तरी कशाला, असे सदस्य अ‍ॅड. शरद पोळ म्हणाले. जिल्हा परिषदेच्या योजना राबविल्या जाऊ नयेत, असा ठराव करण्याची सूचना सुध्दा पोळ यांनी केली. 
   सदस्यांनी ज्या-ज्या लाभार्थींचे फॉर्म दिले, ते जर मंजूर झाले नाहीत, तर मी पशुसंवर्धन विभागाला सोडणार नाही, असा इशारा उपसभापती सुहास बोराटे यांनी दिला. पशुसंवर्धन विभागाचे कामकाज कसे चालते, कोणाला लाभ दिला जातो, हे सगळे मला माहिती आहे. या विभागाची मनमानी मी चालू देणार नाही, असेही ते म्हणाले. त्यावर खुलासा करताना पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. टी. पाटील म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती सर्व सदस्यांना दिलेली आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. परंतु, उपसभापती बोराटे यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले, तुम्ही पत्र दिलेले नाही. दिले असेल, तर मी राजीनामा देतो, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या. मग डॉ. पाटील यांनीही प्रतिआव्हान देत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. ही सभेतील तत्कालिन आणि जोशपूर्ण चर्चा असली, तरी पंचायत समिती सदस्यांना अधिकार्‍यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्नही निर्माण होतो. गेली अनेक वर्षे कराडच्या पंचायत समितीमध्ये सदस्य आणि अधिकार्‍यांचे मानापमान नाट्य सुरू आहे. आजपर्यंत ते थांबले नसल्याचा पुरावाच शनिवारच्या सभेत मिळाला. ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या सभेत एका सदस्याने अधिकार्‍याबद्दल शिवराळ भाषा वापरली होती. त्याचीही चर्चा कराड पंचायत समितीच्या वर्तुळात आहे.
   2004 साली एका सभेत एका सदस्याने महिला अधिकार्‍याबाबत भर सभागृहात गुण गाईचे आणि वाण घोड्याचे, असा शब्दप्रयोग केला होता. त्यावरून मामला पोलीस ठाण्यात जाण्यापर्यंत निघाला होता. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अन्य सदस्यांनी संबंधित सदस्याला महिला अधिकार्‍याची माफी मागायला लावून त्या घटनेवर पडदा टाकला होता. कराड पंचायत समितीच्या ज्या सभागृहात मासिक सभा होतात, त्या सभागृहाला स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह म्हणून ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान आणि राजकारणातील त्यांचे अलौकीक कार्य पाहता ज्यांच्या नावाने राजकारण, समाजकारण केले जाते, त्या स्व. चव्हाण साहेबांचे नाव असलेल्या सभागृहाचा लौकीक जपण्याची जबाबदारी आणि भानसुध्दा सदस्यांनी जपणे तितकेच गरजेचे आहे. हे भान सदस्यांना केव्हा येणार, एवढाच प्रश्न आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.