कराड (सातारा) - कराड-चिपळूण-गुहागर मार्गांवरील कुंभार्ली घाट पुढील दोन दिवस म्हणजे 30 आणि 31 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद (Kumbharli Ghat Closed ) राहणार आहे. चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. त्यामुळे कोकणात 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
कराड-चिपळूण-गुहागर या मार्गावर कुंभार्ली घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या ( Landslides In Kumbharli Ghat ) आहेत. तसेच घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामासाठी दोन दिवस कुंभार्ली घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे काही रस्ते वाहतुकीस बंद असल्यामुळे कुंभार्ली घाट रस्त्यावरुन अवजड वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे किरकोळ अपघात होऊन वारंवार वाहतुक खंडीत होत आहे.
सततची वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी या मार्गाच्या डांबरी पॅचवर्क करण्यात आले. तेही उखडल्याचे निदर्शनास आल्यानंतर घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
रस्त्याचे काम करताना अवजड वाहतुक बंद करण्यात यावी,असे चिपळूण सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे मत आहे. परिणामी 30 ते 31 डिसेंबरपर्यंत गुहागर-चिपळूण-कराड रस्त्यावरील पोफळी नाका ते कुंभाली घाटमाथ्यापर्यंतची वाहतुक बंद ठेवण्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा - New Year Celebration Guidelines : नववर्षाच्या स्वागतासाठी गृहविभागाकडून नवी नियमावली जाहीर