ETV Bharat / state

साताऱ्यातील 'त्या' काळरात्रीला आज 52 वर्षे पूर्ण - koyna Earthquake fifty two years completed

11 डिसेंबर 1967 साली साताऱ्यात कोयना येथे झालेल्या भूकंपाला आज बुधवारी 52 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही त्या काळरात्रीच्या जखमा येथील लोकांच्या मनात कायम आहेत.

koyana Earthquake fifty two years completed
सातारा येथील भुकंपाला ५२ वर्षे पूर्ण
author img

By

Published : Dec 11, 2019, 7:29 PM IST

सातारा - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या 11 डिसेंबर 1967 च्या प्रलयकारी भूकंपाला मंगळवार दिनांक 11 डिसेंबरला तब्बल 52 वर्षे पूर्ण होत आहेत. या भुकंपाच्या उद्रेकामुळे कोयनानगर येथील शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. येथील लोकांच्या मनात भूकंप म्हटले की आजही त्या 11 डिसेंबरची आठवण येते आणि मनात भीतीचे काहूर उठते.

हेही वाचा... Citizenship Amendment Bill : मोदी सरकारची आज राज्यसभेत अग्निपरीक्षा, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

त्या दिवसाच्या आठवणींनी थरकाप उडतो. त्या प्रलयकारी भूकंपामुळे लोकांच्या मनावर झालेल्या जखमा आजही भरून निघाल्या नाहीत. 11 डिसेंबरची पहाट उजाडली की 1967 च्या आठवणीने मन सुन्न होते. कोयना परिसरातील भूकंपाचा तो 11 डिसेंबरचा दिवस आजही काळा दिवस म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत कोयना आणि परिसराने तब्बल दीड लाखांच्यावर भूकंपाचे धक्के पचविले असून येथील जनतेला जणू काही भूकंपाच्या धक्क्यांची सवयच झाली आहे.

हेही वाचा... आता बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट नाही तर वंदनीय, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा

कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 साली झालेल्या 6.7 रिश्टर स्केल तिव्रतेच्या विनाशकारी भूकंपाला 52 वर्षे पूर्ण होत आहेत. या गेल्या 52 वर्षात येथे खूप काही घडून गेले. मात्र येथील भूकंपग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे अजूनही येथील भूकंपग्रस्तांच्या पदरी घोर निराशाच असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा... नाराज विनायक मेटेंनी भाजपकडे केली 'या' पदाची मागणी

11 डिसेंबर 1967 ला पाटण तालुक्याच्या विशेषत: कोयना परिसरात पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपल झाला. यात संपूर्ण कोयना भुईसपाट होवून शेकडो लोकांना आपला हकनाक जीव गमवावा लागला. हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. हजारो घरे जमीनदोस्त झाली. हा विनाशकारी भूकंप संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असला तरी सर्वाधिक जीवित व वित्तहानी मात्र पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी शासकीय मालमत्ता, शैक्षणिक व औद्योगिक इमारती, ग्रामपंचायती, धर्मशाळा, देवालये, समाजमंदिरे, शेती, विहिरी, बंधारे यांचे अतोनात नुसान झाले. तसेच 199 गावठाणांना या भूकंपाचा तडाखा बसला होता. त्यात 34 हजार 934 कुटुंबांचे पूर्ण जीवन उद्‌ध्वस्त होवून 174 लोकांचे बळी गेले होते.

हेही वाचा... औरंगाबादमार्गे नागपूरला जाणार बुलेट ट्रेन? चाचपणीला सुरुवात

गेल्या 52 वर्षात कोयना, पाटण व कऱहाड तालुक्यात भूकंपाचे दीड लाखांच्यावर धक्के बसले आहेत. येथील ज्या बाधित गावांचे पुनर्वसन झाले आहे, तेथे ज्या नागरी सुविधा हव्यात त्या अजून मिळताना दिसत नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे कोयनावासियांना हक्काच्या सेवासुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. 11 डिसेंबरच्या प्रलयकारी भूकंपाची आठवण म्हणून प्रत्येकवर्षी 11 डिसेंबरला कोयनानगरमधील तीन मंदिरात कोयना प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व कोयना विभागातील जनता एकत्र येवून भूकंपात मृत पावलेल्यांना श्रध्दांजली वाहतात.

Intro:सातारा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या 11 डिसेंबर 1967 च्या प्रलयकारी भूकंपाला मंगळवार दि. 11 रोजी तब्बल 52 वर्षे पूर्ण होत आहेत. निसर्गाच्या या उद्रेकामुळे कोयनानगर येथील शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भूकंप म्हटले की आजही त्या 11 डिसेंबरची आठवण येते आणि मनात एकच भितीचे काहूर उठते. आजही त्यावेळच्या आठवणींनी थरकाप उडतो. त्या प्रलयकारी भूकंपामुळे लोकांच्या मनावर झालेल्या जखमा आजही भरून निघाल्या नाहीत. 11 डिसेंबरची पहाट उजाडली की 1967 च्या आठवणीने मन सुन्न होते. कोयना परिसरातील भूकंपाचा तो 11 डिसेंबरचा दिवस आजही काळा दिवस म्हणून ओळखला जातो. कोयनेने तब्बल दीड लाखाच्यावर भूकंपाचे धक्के पचविले असून येथील जनतेला जणू काही भूकंपाच्या धक्क्यांची सवयच झाली आहे.

Body:कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 साली झालेल्या 6.7 रिश्टर  तिव्रता स्केलच्या विनाशकारी भूकंपाला आज 51 वर्षे पूर्ण होत आहेत.  क्षणाधार्थ होत्याचे नव्हते करणाऱ्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीने भूकंपग्रस्तांवर झालेल्या जखमा मात्र आजही ताज्याच आहेत. कोयना परिसरात भूकंपाचा 11 डिसेंबरचा दिवस आजही काळा दिवस म्हणून ओळखला जातो. गेल्या 52 वर्षात आजपर्यंत कोयनेने तब्बल दीड लाखाच्यावर भूकंपाचे धक्के पचविले आहेत. येथील जनतेला जणू काही भूकंपाच्या धक्क्यांची सवयच झाली आहे. एवढे  सर्व काही घडूनही गेल्या 52 वर्षात येथील भूकंपग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे अजूनही येथील भूकंपग्रस्तांच्या पदरी  घोर निराशाच असल्याचे दिसून येत आहे.

11 डिसेंबर 1967 हा दिवस पाटण तालुक्याच्या विशेषत: कोयनावासियांच्या काळाजात धस्स करणारा आणि 52 वर्षापूर्वीच्या त्या कटु आठवणी पुन्हा जागे करणारा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या जबरदस्त धक्क्याने होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण कोयना भुईसपाट होवून शेकडो लोकांना आपला हकनाक जीव गमवावा लागला. हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. हजारो घरे जमीनदोस्त झाली. हा विनाशकारी भूकंप संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असला तरी सर्वात जास्त जिवीत व वित्त हानी मात्र पाटण तालुक्यात झाली होती. आज 52 वर्षानंतरही त्या हानीच्या जखमा कायम राहिल्या आहेत. या प्रलयकारी भूकंपाच्या तडाक्यामुळे कोयनानगर परिसरातील शेकडो लोकांचे प्राण गेले होते. घरे आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्या होत्या. त्यावेळी शासकीय मालमत्ता, शैक्षणिक व औद्योगिक इमारती, ग्रामपंचायती, धर्म शाळा, देवालये, समाजमंदिरे, शेतांच्या ताली, शेती अवजारे, विहिरी, बंधारे यांच्यासह जनावरे मृत पावली होती. तसेच 199 गावठाणांना भूकंपाचा तडाखा बसला होता. त्यात 34 हजार 934 कुटुंबांचे पूर्ण जीवन उद्‌ध्वस्त होवून 174 लोकांचे बळी गेले होते.

गेल्या 52 वर्षात कोयना, पाटण व कराड तालुक्यात भूकंपाचे दीड लाखाच्यावर धक्के बसले आहेत. येथील ज्या बाधित गावांचे पुनर्वसन झाले आहे तेथे ज्या 18 नागरी सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र अद्यापपर्यंत तसे झालेले दिसत नाही. शासनाच्या उदासिनतेमुळे कोयनावासियांना हक्काच्या सेवासुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. 11 डिसेंबरच्या प्रलयकारी भूकंपाची आठवण म्हणून प्रत्येकवर्षी 11 डिसेंबरला कोयनानगरमधील तीन मंदिरात कोयना प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व कोयना विभागातील जनता एकत्र येवून भूकंपात मृत पावलेल्यांना श्रध्दांजली वाहतात.  या भूकंपाला 52 वर्षे होत असताना येथील भूकंपग्रस्तांच्या वसाहती आठरा नागरी सुविधांपासून अद्याप वंचितच आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.