सातारा : कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात (Municipality clean survey competition) पुन्हा एकदा देशपातळीवर यश मिळवत पहिल्या पाच क्रमांकात बाजी मारली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्येच्या गटात कराड पालिका अव्वल आली (Karad Municipality topped the country) आहे. पाच नगरपालिकांना दि. १ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन - देशात अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबविलेल्या उपक्रमांवर आधारित प्रदर्शन दिल्ली येथे दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कराड नगरपालिका भाग घेणार आहे. दोन दिवसांच्या प्रदर्शनानंतर १ आक्टोंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार (Municipality clean survey competition) आहे.
दोन पालिकांचा पहिल्या पाचमध्ये समावेश - स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी नगरपालिकांनी पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान पटकावला (Karad Municipality clean survey competition ) आहे. त्याचबरोबर देवळाली कन्टोन्मेंट कॅम्प, नवी मुंबई व नगर कन्टोन्मेंट कॅम्पचाही पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. कराड पालिकेने यापूर्वी माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकला आहे. सलग चार वर्षे कराड पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहिली आहे. २०१८ साली स्वच्छ सर्वेक्षण (Municipality clean survey) स्पर्धा सुरू झाली. तेव्हापासून कराड पालिकेने आपले अव्वल स्थान राखले आहे.