ETV Bharat / state

Avalanche In Ladakh: लडाखमधील हिमस्खलनात सातार्‍याच्या सुपुत्राला वीरमरण, पार्थिवावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार - Shankar Anklekar of Satara Was Martyred

Avalanche In Ladakh: लडाखमध्ये पर्वतारोहणाचं प्रशिक्षण सुरू असताना अचानक हिमस्खलन होऊन भारतीय सैन्य दलातील सातार्‍याच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. शंकर बसाप्पा अंकलीकर, (Shankar Basappa Anklekar) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून उद्या (शुक्रवार, दि.१३) वसंतगड (ता. कराड) येथे शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

avalanche in Ladakh
लडाखमधील हिमस्खलनात सातार्‍याचा जवान शहीद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 7:59 PM IST

सातारा Avalanche In Ladakh: लडाखमध्ये पर्वतारोहणाचं प्रशिक्षण सुरू असताना अचानक हिमस्खलन होऊन भारतीय सैन्य दलातील सातार्‍याच्या सुपूत्राला वीरमरण आलं. या हिमस्खलनात कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र नायब सुभेदार शंकर बसाप्पा अंकलीकर (Shankar Basappa Anklekar) हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव उद्या (शुक्रवार, दि.13) मूळगावी वसंतगड येथे दाखल होणार असून शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार (Jawan Shankar Anklekar funeral) होणार आहेत. या घटनेमुळे कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हलाखीच्या परिस्थितीत घेतलं शिक्षण : भारतीय सैन्य दलातील जवानांना पर्वतारोहणाचं प्रशिक्षण देण्यात येत असताना अचानक हिमस्खलन झालं. या हिमस्खलनात नायब सुभेदार शंकर अंकलीकर यांना वीरमरण आलं. नायब सुभेदार शंकर अंकलीकर यांचं शिक्षण वसंतगड येथे जिल्हा परिषद शाळेत आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झालं आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. सन 2001 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांची 22 वर्ष सेवा बजावली. त्याच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पत्नी आणि 6 वर्षांची मुलगी, असा परिवार आहे.

प्रशिक्षण सुरु असताना घडली घटना : लडाखमधील माउंट कुन परिसरात ८ ऑक्टोबरला भारतीय सैन्य दलातील तुकडीचं 'ट्रेन द ट्रेनर' या मोहिमेनुसार प्रशिक्षण सुरु होतं. प्रशिक्षणादरम्यान अचानक हिमस्खलन झालं. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील चार जवान अडकले. त्यामुळे तत्काळ या जवानांच्या बचावासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र, या बचावात एका जवानाचं पार्थिव घटनास्थळावर मिळून आलं, तर तीन जवान बेपत्ता होते. बचाव कार्य संपल्यानंतर वीरमरण आलेल्या जवानांची ओळख जाहीर केली जाईल, असं सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं होतं.

पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार : जवानाला वीरमरण आल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्यांनतर वसंतगड परिसर शोकाकूल झाला आहे. ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली आहे. वीरमरण आलेल्या जवान शंकर अंकलीकर यांचे पार्थिव विमानाने पुण्यात येणार आहे. तेथून ते वसंतगड याठिकाणी आणलं जाईल. शुक्रवारी (दि. 13) सकाळी शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा -

  1. शहीद जवानाला अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलीने दिला मुखाग्नी
  2. Ladakh Accident : सातार्‍याचा जवान लडाखमधील दुर्घटनेत शहीद, फलटण तालुक्यावर शोककळा
  3. शहीद जवानाला अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलीने दिला मुखाग्नी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.