ETV Bharat / state

Accident VIDEO : पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बसने चौघांना उडवले; पाहा, भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ - पुणे बंगळुरू महामार्ग

पुणे-बंगळुरू महामार्गावर ( Pune-Bangalore Highway Accident ) शिरवळ येथील पुणे थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना पुण्याकडे भरधाव निघालेल्या खासगी बसने ( Private bus accident ) उडविले. या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी ( Four people were seriously injured ) झाले आहेत. जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद ( Accident captured on CCTV ) झाला आहे.

Thrilling video of a horrific accident
भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ
author img

By

Published : Jul 12, 2022, 7:30 PM IST

सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावर ( Pune-Bangalore Highway Accident ) शिरवळ येथील पुणे थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना पुण्याकडे भरधाव निघालेल्या खासगी बसने ( Private bus accident ) उडविले. या भीषण अपघातात चार जण गंभीर ( Four people were seriously injured ) जखमी झाले आहेत. जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद ( Accident captured on CCTV ) झाला आहे. महामार्गावरील पांढऱ्या पट्ट्यांना गतिरोधक समजून खासगी बस चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गावर आडवी झाली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले प्रवाशी यात सापडले. या घटनेत मयूर रवींद्र रावे (या. हिंजवडी, पुणे), रणजित कुंभार (रा. पुणे), निकिता दत्तात्रय जाधव (२३, रा. अतिट, ता. खंडाळा) व सुंदर सुरेश मोदी (२८, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले.

भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ

हेही वाचा - Breaking News : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले

दरम्यान, काल कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात कोतोली ( Kotoli in Panhala Taluka of Kolhapur ) येथे लहान मुलांच्या खासगी शाळेची बस शेतात पलटी होती. यामध्ये 20 ते 25 मुले प्रवास करीत ( 20 to 25 Children Traveling in Bus ) होते, अशी माहिती मिळत असून, अनेकजण जखमी झाले आहेत. कोतोली परिसरातील काही गावांमधून मुलांना घेऊन ही बस शाळेकडे जात होती. मात्र, पिंपळे गावातून आळवे गावाकडे जाताना असलेल्या अरुंद रस्त्यावरू खाली शेतामध्ये ही बस पलटी झाली. येथील के. एस. चौगले इंग्लिश मीडियम शाळेमधील ( Chougale English Medium School ) हे सर्व विद्यार्थी होते.

शाळेमध्ये पालकांची गर्दी : दरम्यान, बस पलटी होऊन अपघात झाल्याची माहिती समजताच उत्रे, वाघवे, पिंपळे गावातील जे काही विद्यार्थी यामधून आले होते. त्यांच्या पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन याबाबत माहिती घेतली. एकूण 20 ते 25 विद्यार्थी यामधून शाळेकडे चालले होते. मात्र, पिंपळे गावातून आळवे गावात जात असताना अरुंद रस्त्यावरून बस जात असताना शेजारीच असलेल्या शेतात कोसळली आणि पलटी झाली. या सर्वांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार केले. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून, काहीजण किरकोळ जखमी आहेत.

पावसाळी वातावरणामुळे रस्ते निसरडे : जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांत आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्या रस्त्यांवर पाणी साचले असून, रस्तेदेखील निसरडे झाले असल्याने रस्त्यावरून वाहनेदेखील घरसरून पडत आहेत. वातावरणदेखील ढगाळ स्वरूपाचे आहे. जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांत आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - Flood in Shahapur : ठाण्यात पुराचे थैमान; पुरामध्ये चौघे जण बेपत्ता, २ मृतदेह सापडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.