सातारा - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी साताऱ्यात आले होते. ही भेट राजकीय निर्णयांबाबत होती का, असा सवाल केला असता त्यांनी "मी राजकारण सोडून तुमच्या सारख्या मित्रांसोबत फिरण्याचा विचार करतोय", अशी मिश्किल प्रतिक्रिया पत्रकारांना दिली.
उदयनराजे यांच्या 'जलमंदिर पॅलेस' या ठिकाणी ही भेट झाली. ही भेट कुौटुंबिक असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे.