सातारा - हरियाणा राज्यातील 25 उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी निढळ गावास भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी गावातील विकास कामांची पाहणी केली आहे. यात हरियाणा मंत्रालयातील उपसचिव, सहसचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , सहसंचालक तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांचा या अभ्यास दौऱ्यातील पथकात समावेश होता.
यशदा या महाराष्ट्र राज्याच्या शिखर प्रशिक्षण संस्थेत या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु असून त्याचाच भाग म्हणून यशदाने निढळ गावाचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. आज या पथकाचे निढळ गावात आगमन झाले. हे प्रशिक्षण येथील हनुमान विद्यालयात पार पडत आहे. दुपारपर्यंतच्या सत्रात शिवारातील विकास कामांची या पथकाने पाहणी केली.त्यानंतर, सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांशी प्रश्नोत्तरे व चर्चा पार पडली.