ETV Bharat / state

Satara Accident : धक्कादायक! ट्रक- दुचाकी अपघात; नातू जागीच ठार तर आजी-आजोबा जखमी - Grandson killed

पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडच्या नवीन कोयना पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघातात ( Truck bike accidents ) नितीन कुंभार हा ७ वर्षांच्या मुलगा जागीच ठार झाला आहे. तर त्याचे आजी-आजोबा जखमी ( Grandson killed and grandparents injured ) झाले आहेत.

Satara Accident
ट्रक- दुचाकी अपघात
author img

By

Published : Dec 26, 2022, 9:24 PM IST

सातारा : जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक-दुचाकीच्या झालेल्या अपघातात ( Truck bike accidents ) ७ वर्षांच्या मुलगा जागीच ठार झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना कराडमधून समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडच्या नवीन कोयना पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आराध्य नितीन कुंभार हा ७ वर्षांच्या मुलगा जागीच ठार तर आजी-आजोबा जखमी ( Grandson killed and grandparents injured ) झाले आहेत. ( Satara Accident )

ट्रकची दुचाकीला धडक : आराध्य हा आजी-आजोबा सोबत दुचाकीवरून पाटणकडे निघाला होता. नवीन कोयना पुलावर मालट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आराध्यचा जागीच मृत्यू झाला तर आजी-आजोबा जखमी झाले.

घटनेमुळे परिसरात शोककळा : जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळकृष्ण मारूती कुंभार आणि कुसूम बाळकृष्ण कुंभार (रा. सांगवड, ता. पाटण) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.