ETV Bharat / state

Satara Crime : सातार्‍यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात सोनारच निघाला सूत्रधार

सराफ व्यावसायिकाला फिल्मी स्टाईलने लुटणार्‍या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला ( Goldsmith turned out to be the mastermind ) आहे. म्हसवडमधील एक सोनारच गुन्ह्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार निघाला असून पोलिसांनी संशयितांना अटक केली ( Police arrested the suspects ) आहे.

Satara Crime
सातार्‍यातील जबरी चोरी
author img

By

Published : Sep 28, 2022, 7:09 PM IST

सातारा : माण तालुक्यातील मलवडीमध्ये सराफ व्यावसायिकाला फिल्मी स्टाईलने लुटणार्‍या गुन्ह्याचा पर्दाफाश ( Goldsmith turned out to be the mastermind ) झाला आहे. म्हसवडमधील एक सोनारच गुन्ह्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार निघाला असून सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 435 ग्रॅम सोन्यासह सुझुकी कार, स्प्लेंडर मोटारसायकल, पिस्टल, चाकू असा एकूण 17 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुर्वां उर्फ दुर्योधन नाना कोळेकर वय 34, रणजित भाऊ कोळेकर वय 20, राहणार धुळदेव, तालुका माण, योगेश तुकाराम बरडे वय 35, राहणार पिलीव रोड बरडे वस्ती माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि रामदास विठ्ठल गोरे वय 20, राहणार म्हासाळवाडी, तालुका माण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मोटरसायकलवरून घरी जाताना लुटला होता ऐवज : मलवडी येथील श्रीकांत तुकाराम कदम आणि त्यांचा पुतण्या श्रीजित शिवाजी कदम हे रविवार, दि. 25 रोजी सराफी दुकान बंद करून दुकानातील सोने, चांदीचा ऐवज आणि 7 लाखाची रोकड असलेल्या तीन पिशव्या घेऊन सायंकाळी पावणे आठच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी निघाले होते. म्हसवड-माळशिरस मार्गावरून जात असताना अचानक दोघांनी मोटारसायकलला धक्का देत त्यांना खाली पाडले. पिस्टलचा धाक दाखवत पिशव्यांमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटून पलायन केले होते. या झटापटीत एका संशयिताला पकडण्यात यश आले होते. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून म्हसवड पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संयुक्तरित्या तपास करत होते.

गुन्ह्यात स्थानिक सोनाराचा हात : सराफ व्यावसायिकाच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच स्थानिक सोनाराने माळशिरस, धुळदेव, म्हासाळवाडी येथील साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा ऐवज, तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने, पिस्टल आणि चाकू, असा एकूण 17 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. म्हसवड न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाई : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक अमित पाटील, उपनिरीक्षक विशाल भंडारे, हवालदार उत्तम दबडे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, शिवाजी गुरव, अमर नारनवरे, नितीन धुमाळ, किरण चव्हाण, धनाजी शिंदे, सुरज काकडे, नवनाथ शिरकुळे, सतीश जाथव, नीलेश कुदळे यांच्या संयुक्त पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून संशयितांना जेरबंद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.