सातारा: म्हसवड, वडूज, दहिवडी, सातारा, धायरी (पुणे) व कामोठे (रायगड) येथील 'एटीएम'मध्ये खातेदारांचे पैसे काढताना तांत्रिक अडथळा आणून आरोपींनी बॅंकांची ३ कोटी ३७ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यातील ८६ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
उत्तर प्रदेशातून आरोपींना अटक: म्हसवड पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तपास केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना जेरबंद केले गेले. आरोपींकडून ४ मोबाईल, विविध बँकांचे 'एटीएम कार्ड' हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींनी गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. या आरोपींकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चार मोबाईल, बॅंकांची एटीएम कार्ड जप्त - सातारा पोलिसांनी उत्तरप्रदेशमध्ये जाऊन गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने तपास केला. चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ मोबाईल आणि विविध बँकांची एटीएम कार्ड जप्त केली.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता - आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी वापरलेल्या एटीएम कार्डच्या आधारे संबंधित खात्यांची माहिती घेवून ती बँक खाती गोठविण्याची आणि फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार आत्तापर्यंत ८६ लाख ४५ हजार ६०० रुपये गोठविण्यात यश आले आहे.
८८८ किलोचे तांबे जप्त: सातारा एलसीबीने चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून तांब्याच्या विटा व ११ बॅटरी, असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साताऱ्यातील विपूल इंटरप्रायजेसमधील तांब्याच्या विटा व ११ बॅटरी चोरून त्या विकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांच्याकडून ८८८ किलो वजनाच्या ५ लाख ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एटीएम कार्ड क्लोन करून फसवणूक: एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम मशीनमधून तब्बल दीड लाख रुपये काढून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. सप्टेबर, 2021 मध्ये ही घटना घडली होती. वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
जाणून घ्या घटनाक्रम: नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सीए मार्गावर वर्धमान अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएम मशीनमधून दोन चोरट्यांनी १७ ते १८ ऑगस्ट दरम्यान एक लाख 50 हजार रुपये वेगवेगळ्या एटीएम कार्डचा उपयोग करून काढले आहेत. एटीएम मशीनमधून पैसे कमी झाल्यानंतरदेखील कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसल्याची माहिती बँक स्टेटमेंटमध्ये दाखवते आहे. त्यामुळे बँकेची फसवणूक करण्याची नवीन शक्कल चोरट्यांनी शोधून काढली आहे. चोरट्यांनी बँकेची फसवणूक करण्यासाठी एसबीआयचे एटीएम वापरून तब्बल एक लाख 50 हजार रुपये काढलेले आहेत. या संदर्भात माहिती समजताच बँकेच्या व्यवस्थापकांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चोरट्यांचा एटीएममधून पैसे काढतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मात्र, यात चोरट्यांनी तोंडावर मास्क लावले असल्याने त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पोलीस तपासात अडचण येऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेड सार्वजनिक करण्यात आलेले नाही.
हेही वाचा: