ETV Bharat / state

जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील विद्यार्थ्यांचे पर्यावरणासाठी आंदोलन - विद्यार्थ्यांचे पर्यावरण्यासाठी आंदोलन

स्विडन देशातील 'ग्रेटा थनबर्ग' या सोळा वर्षांच्या मुलीने जगभरातील विद्यार्थ्यांना 'हवामानासाठी शाळा बंद' अशी साद घातली आहे. तिच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पांचगणी येथील बिल्लीमोरीया हायस्कूलने आवाहन केल्याबरोबर सर्व शाळांनी तसेच रोटरी क्लब आणि आय लव्ह पांचगणी संस्थेने त्यांना साद दिली.

जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील विद्यार्थ्यांचे पर्यावरण्यासाठी आंदोलन
author img

By

Published : Sep 21, 2019, 11:08 PM IST

सातारा- ग्लोबल वार्मिंगमुळे हवामानात अमुलाग्र बदल होत आहेत. त्याचे तीव्र पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागत आहेत. अगदी थंड हवेची ठिकाणेही यापासून सुटली नाहीत. जागतिक तापमानवाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे 'पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावतील शेकडो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरत अभिनव आंदोलन केले.

जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील विद्यार्थ्यांचे पर्यावरणासाठी आंदोलन

हेही वाचा- मोबाईलची फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करताना स्फोट; १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी

स्विडन देशातील 'ग्रेटा थनबर्ग' या सोळा वर्षांच्या मुलीने जगभरातील विद्यार्थ्यांना 'हवामानासाठी शाळा बंद' अशी साद घातली आहे. तिच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पांचगणी येथील बिल्लीमोरीया हायस्कूलने आवाहन केल्याबरोबर सर्व शाळांनी तसेच रोटरी क्लब आणि आय लव्ह पांचगणी संस्थेने त्यांना साद दिली. विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवून राज्यकर्ते, पालक, गावातील जबाबदार व्यक्ती यांच्यामध्ये हवामान बदलाबाबत जागरुकता येण्यासाठी अनोखे आंदोलन केले. या रॅलीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते करण्यात आला. या रॅलीत सर्व शांळांचे विद्यार्थी, रोटरी व आय लव्हचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा- निवडणुकीत महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी - अशोक चव्हाण

अलीकडच्या काळात बदलते हवामान यामुळे सर्वजण चिंताग्रस्त झाले आहेत. भारताची विकासाच्या दिशेने वाटचाल होत असताना वातावरणीय बदल (ग्लोबल वॉर्मिंग) मात्र आपली वाट अडवून उभे आहेत. विकास आणि पर्यावरणीय बदलाचे व्यस्त प्रमाण भारतासाठी अडचणीचे ठरत आहे. अगदी पांचगणी-महाबळेश्वर ही जागतिक दर्जाची थंड हवेची ठिकाणेही यातून सुटली नाहीत. हरीतपट्टा कमी होत चालल्याने येणारी वर्षे खडतर असल्याचा इशारा पर्यावरण अभ्यासक देत आहेत. ही परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांनी 'ग्रेटा'ने केलेल्या आवाहनाला आंदोलन करुन साथ दिली. 'पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा', 'झाडे लावा झाडे जगवा ' चे फलक घेऊन आंदोलन केले. पांचगणी शहरातून पांचगणीतील सुमारे ३५ शाळांमधील विद्यार्थ्यानी रॅली काढत जनजागृती केली. वृक्षतोड, वाढणारी सिमेंटची जंगले, पुर, त्सुनामी, दुष्काळ, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे आवाहनही या रॅलीतून केले.

Intro:सातारा ग्लोबल वार्मिंगमुळे हवामानातं अमुलाग्र बदल होत असून, त्याचे तिव्र पडसाद जागतीक स्तरावर उमटत आहेत. त्याचे परिणाम तुम्हा-आम्हा सर्वानाच भोगावे लागत आहेत. अगदी थंड हवेची ठिकाणेही यापासून सुटली नाहीत. जागतिक तापमानवाढीपासून पृथ्वीला वाचवायचं असेल तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सार घडत आहे. त्यामुळे 'पर्यावरण वाचवा - पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावतील शेकडो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरत अभिनव आंदोलन केले.

Body:स्वीडन देशातील 'ग्रेटा थनबर्ग' या सोळा वर्षांच्या मुलीने जगभरातील विद्यार्थ्यांना 'हवामानासाठी शाळा बंद' अशी साद घातली आहे. तिच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पांचगणी येथील बिल्लीमोरीया हायस्कूलने आवाहन केल्याबरोबर सर्व शाळांनी तसेच रोटरी क्लब आणि आय लव्ह पांचगणी संस्थेने त्यांना साद देत विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवून राज्यकर्ते, पालक, गावातील जबाबदार व्यक्ती यांच्यामध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता येण्यासाठी अनोखे आंदोलन केले. या रॅलीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी चौकात सपोनि विकास बडवे यांच्या हस्ते करण्यात आला. या रॅलीत सर्व शांळांचे विद्यार्थी, रोटरी व आय लव्ह चे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

अलीकडच्या काळात बदलते हवामान यामुळे सर्व जन चिंताग्रस्त झाले आहेत. भारताची विकासाच्या दिशेने गतीने वाटचाल होत असताना वातावरणीय बदल (ग्लोबल वॉर्मिंग) मात्र आपली वाट अडवून उभे आहेत. विकास आणि पर्यावरणीय बदलाचे व्यस्त प्रमाण भारतासाठी अडचणीचे ठरत आहे. अगदी पांचगणी - महाबळेश्वर हि जागतिक दर्जाची थंड हवेची ठिकाणेही यातून सुटली नाहीत. हरितपट्टा कमी होत चालल्याने येणारी वर्षे खडतर असल्याचा इशारा पर्यावरण अभ्यासक देत आहेत. ही परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांनी 'ग्रेटा'ने केलेल्या आवाहनाला आंदोलन करून साथ दिली. 'पर्यावरण वाचवा - पृथ्वी वाचवा' 'झाडे लावा झाडे जगवा ' चे फलक घेऊन आंदोलन केले. पांचगणी शहरातून पांचगणितील सुमारे ३५ शाळांमधील विद्यार्थ्यानी रॅली काढत जनजागृती केली. वृक्षतोड, वाढणारी सिमेंटची जंगले, पूर, त्सुनामी, दुष्काळ, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे आवाहनही या रॅलीतून केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.