सातारा - जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील पुष्प हंगामाला सुरूवात झाली ( flower season begins ) आहे. नैसर्गिक बदलांमध्ये पर्यटकांना पुष्प हंगाम कधी सुरू होणार, याची प्रतिक्षा लागून होती. ती संपली असून फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा वन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सायकल सफारीचा ( Bicycle Safari in flower season ) नाममात्र शुल्कामध्ये पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे.
काही प्रजातींची फुले फुलली ( flower season begins on Kas Plateau ) नैसर्गिक बदलामुळे यंदा कास पठारावरील पुष्प हंगाम कधी सुरू होणार ? असा प्रश्न पर्यटक सातत्याने विचारत होते. मात्र, पठारावरील एकूण प्रजातींपैकी काही प्रजातींची फुले फुलण्यास सुरुवात झाल्यानंतर यंदाचा पुष्प हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. अद्यापही पूर्ण क्षमतेने पठारावरील फुले फुलली नसल्याचे दिसत आहे, मात्र, फुले फुलण्यास सुरूवात झाली असल्याने निसर्गप्रेमींसह पर्यटकांची पावले आता कास पठाराकडे वळली आहेत.
कास पठारावर आता सायकल सफारीही कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामनुजम यांच्या हस्ते कास पठारावरील पुष्प हंगामाचा शुभारंभ झाला. यंदापासून कास पठारावर फुलांसोबतच आता सायकल सफारीही करता येणार ( Bicycle Safari in flower season on Kas Plateau ) आहे. वन विभागातर्फे नाममात्र शुल्कात सायकल भ्रमंतीची सोय करण्यात आली आहे, पहिल्याच दिवशी पर्यटकांचा सायकल सफारीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. ऐतिहासिक राजमार्गाने पर्यटकांना सायकल सफारी करता येणार आहे.