ETV Bharat / state

मौजमजेसाठी घरफोड्या करणारी पाच जणांची टोळी जेरबंद - पाचजणांची टोळी जेरबंद

कोणताही कामधंदा न करता मौजमजा करणे, चांगल्या हॉटेल्समध्ये खाण्या-पिण्यासाठी घरफोडी व चोर्‍या करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 26, 2019, 8:35 PM IST

सातारा - कोणताही कामधंदा न करता मौजमजा करणे, चांगल्या हॉटेल्समध्ये खाण्या-पिण्यासाठी घरफोडी व चोर्‍या करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संशयितांनी १५ घरफोड्या-चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

अक्षय मारुती गायकवाड (वय 26), अविनाश बाबासाहेब चव्हाण (वय 29, दोघेही रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विष्णू प्रकाश जठार (वय 26 वर्षे, रा. टकले बोरगाव, ता. कोरेगाव), संतोष यशवंत घोरपडे (वय 28, रा. चोरगेवाडी, ता. कोरेगाव), सुशांत दत्तू लोकरे (वय 38 वर्षे, रा. चोराडे, ता. खटाव) अशी संशयितांची नावे आहेत.

रहिमतपूर परिसरामध्ये राहणारे रेकॉर्डवरील आरोपी हे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून बाहेर पडून चोरी करीत असल्याची माहिती बुधवारी (दि. 25 डिसें) पोलिसांना मिळाली होती. हे संशयित आरोपी कुठलाही कामधंदा न करता सुध्दा त्यांचे राहणीमान चांगले असून दररोज चांगल्या हॉटेलमध्ये पार्ट्या करत असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई त्य‍ांच्याकडे वळली. उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकाने 5 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी रहिमतपूर, बोरगाव, पाटण, औंध, उंब्रज परिसरात रात्रीच्यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळा, बंद दुकाने, पान टपऱ्या, हॉटेल्स, मोबाईल शॉपीमध्ये घरफोड्या केल्याची माहिती दिली. तसेच पाटण, उंब्रज, औंध, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील काही गावांमध्ये एकूण 12 घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली.

हेही वाचा - सामूहिक बलात्कार प्रकणातील आरोपी अटकेत

पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकातील हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, राजू ननावरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नितीन भोसले, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहसिन मोमीन, संजय जाधव, विजय सावंत, पंकज बेसके यांनी ही कारवाई केली.

या संशयितांकडून गुन्ह्यात चोरी झालेल्या मालापैकी

1 प्रोजेक्टर, 1 स्कॅनर-प्रिंटर, 1 प्रिंटर, 9 एलसीडी मॉनीटर, 3 सीपीयु, 6 किबोर्ड, 3 माऊस, 1 हजार रुपये किंमतीची ड्रिपसाठी वापरण्यात येणारी औषधे व बॅगा असा एकूण दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांचे आवाहन

पाटण, निसरे फाटा, उंब्रज, उरुल, औंध, चौकीचा आंबा, बोरगाव, निसराळे फाटा या गावांमध्ये संशयितांनी रात्रीच्या घरफोड्या केल्या आहेत. तरी नागरीकांनी या गुन्ह्यांबाबत तक्रार संबंधीत पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

हेही वाचा - सातारा : दरोड्यातील आरोपीची पोलिसांच्या हातात तुरी

Intro:सातारा : कोणताही कामधंदा न करता छानछौकीसाठी घरफोडी व चोर्‍या करुन रोज चांगल्या हॉटेलमध्ये पार्ट्या झोडणार्‍या पाचजणांच्या टोळीला सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संशयितांनी १५ घरफोडया-चोऱ्यांची कबुली दिली आहे. Body:अक्षय मारुती गायकवाड (वय 26), अविनाश बाबासाहेब चव्हाण (वय 29 दोघेही रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विष्णू प्रकाश जठार (वय 26 रा. टकले बोरगाव, ता. कोरेगाव), संतोष यशवंत घोरपडे (वय 28 रा. चोरगेवाडी, ता. कोरेगाव), सुशांत दत्तु लोकरे (वय 38 रा. चोराडे, ता. खटाव) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी उपनिरीक्षक प्रसन्न जहाड यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. रहिमतपूर परिसरामध्ये राहणारे रेकॉर्डवरील आरोपी हे रात्रीच्या वेळी दुचाकीवर बाहेर पडून चोरी करीत असल्याची माहिती काल (ता. २५) पोलिसांना मिळाली. हे संशयित आरोपी कुठलाही कामधंदा न करता सुध्दा त्यांचे राहणीमान हे चांगले असून दररोज चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये पाटर्या करत असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई त्य‍ांच्याकडे वळवली. प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकाने 5 संशयित‍‍ांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे घरफोडी- चोरीच्या गुन्हयांच्या अनुषंगाने कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी रहिमतपूर, बोरगाव, पाटण, औंध, उंब्रज परिसरात रात्रीच्यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळा, बंद दुकाने, पान टपऱ्या, हॉटेल्स, मोबाईल शॉपी मध्ये घरफोडया केल्याची प्राथमिक माहिती दिली. तसेच पाटण, उंब्रज, औंध, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील काही गावांमध्ये एकूण १२ घरफोडया केल्याची कबुली त्यांनी दिली.

या संशयितांकडून गुन्हयात चोरी झालेल्या मालापैकी 1 प्रोजेक्टर, 1
स्कॅनर प्रिंटर, 1 प्रिंटर, 9 LCD मॉनीटर, 3 सीपीयु, 6 किबोर्ड, 3 माऊस व 10,000 रुपये किंमतीची ड्रिप करीता
वापरण्यात येणारी औषधे व बॅगा असा एकूण दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांचे आवाहन
पाटण, निसरे फाटा, उंब्रज, उरुल, औंध, चौकीचा आंबा, बोरगाव, निसराळे फाटा या गावांमध्ये संशयितांनी रात्रीच्या घरफोडया केल्या आहेत. तरी नागरीकांनी या गुन्हयांबाबत तक्रार संबंधीत पोलिस ठाण्यात देण्याचे अावाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

उपनिरीक्षक प्रसन्न जहाड, हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले,
प्रविण फडतरे, राजू ननावरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नितीन भोसले, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहसिन मोमीन, संजय जाधव, विजय सावंत, पंकज बेसके यांनी ही कारवाई यशस्वी केली.

---------------------
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.