कराड (सातारा) - दिवंगत सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्ति कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आदरांजली वाहिली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सौ. वेणूताईंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने दिवंगत सौ. वेणूताई चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पालकमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा
सहकार व पणन मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांना वेणूताईंनी 41 वर्षे खंबीर साथ दिली होती. यशवंतरावांच्या कौटुंबिक आणि राजकीय कारकिर्दीतील यशस्वी वाटचालीत वेणूताईंचेही मोठे योगदान होते, अशा शब्दांत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वेणूताईंच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त नंदकुमार बटाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.