सातारा - जन्मदात्या पित्याने दोन मुलांचा गळा आवळून खून केला आहे. ही घटना पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चंद्रकांत मोहिते (रा. कोयना नगर, रासाटी, ता. पाटण, हल्ली रा. घाटकोपर, मुंबई) असे खूनी पित्याचे नाव आहे.
गौरवी मोहिते (वय 11 वर्षे), प्रतिक मोहिते (वय ७ वर्षे), अशी दुर्दैवी मुलांची नावे आहे. या प्रकरणी आरोपी बापास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - छत्रपती उदयनराजे भोसलेंचा शाही दसरा उत्सव
मुंबई मधून हे तिघे बेपत्ता झाले होते. याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली होती. महामार्गावर पोलिसांना बुधवारी पहाटे संबधित कार शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळाली. मात्र, यातील दोन्ही मुलांचा गळा आवळून खून झाला होता. तर चंद्रकांत मोहिते तिथेच होता. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - साताऱ्यातील बंड काही प्रमाणात थंड; मैदानात फक्त दिग्गजांमध्ये लढत