ETV Bharat / state

Satara Crime News : साताऱ्यातील वेटरकडे सापडल्या बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या बारा नोटा - Fake Notes Found with Waiter in Satara

साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाच्या ( Fake Notes Found with Waiter in Satara ) वेटरकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या ( Twelve Notes of Two Hundred Rupees ) आहेत. शेखर नानासाहेब थोरात (रा. चंदननगर-कोडोली, सातारा) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Fake Notes Found with Waiter in Satara, Twelve Notes of Two Hundred Rupees
साताऱ्यातील वेटरकडे सापडल्या बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या बारा नोटा
author img

By

Published : Dec 26, 2022, 11:03 PM IST

सातारा : सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये काम ( Fake Notes Found with Waiter in Satara ) करणाच्या वेटरकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या ( Twelve Notes of Two Hundred Rupees ) आहेत. शेखर नानासाहेब थोरात असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सातारा ग्रामीण पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

सापळा रचून पकडले डी-मार्ट परिसरातील ब्रीजजवळ एका तरुण येणार असून त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. शेखर थोरात हा तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. स्वतः नोटा छापल्याचे सांगत तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. न्यायालयाने त्याला दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे तपास करीत आहेत.

काही वर्ष होता होमगार्ड शेखर थोरात याने यापूर्वी काही वर्षे होमगार्ड म्हणून काम केले होते. सध्या तो साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ही पार्श्वभूमी असताना त्याने बनावट नोटा कोठून आणल्या, याचा पोलीस छडा लावत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.