ETV Bharat / state

बनावट दस्त प्रकरण : साताऱ्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Oct 30, 2020, 6:51 AM IST

साताऱ्यात दहा वर्षांपूर्वी घडलेले बनावट दस्त प्रकरण उघडकीस आले आहे.

tahsildar office, satara
तहसिलदार कार्यालय, सातारा

सातारा - मूळ हिस्सेदार म्हणून बोगस व्यक्ती उभे करून मिळकतीच्या विक्री प्रमाणपत्राचा बनावट दस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी चौघावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव (रा. नेले, ता. सातारा) आणि एक अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहाय्यक दुय्यम निबंधक विजय शहाजी जगताप (वय 52, रा. नीतिराज निवास, अहिरे कॉलनी, देगाव रोड, सातारा) यांनी तक्रार दिली.

काय आहे प्रकार?

नेले येथील रामदास गुलाबराव जाधव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास 2019मध्ये बोगस दस्त झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयाने तपासणी आणि चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. 7 जून 2010ला सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात गट नं. 611 मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावरील सहहिस्सेदार मधुकर यदू पवार, मारुती यदू पवार आणि छबुबाई दशरथ निकम होते. मात्र, 32 ग विक्री प्रमाणपत्र नोंदणीकामी सहाय्यक दुय्यम निबंधकांच्या समोर मारुती यदु पवार यांच्याऐवजी अनोळखी बोगस व्यक्ती आणि मधुकर यदु पवार यांच्याऐवजी नेले येथील जगन्नाथ गणपती जाधव यांना उभे करुन जबाब दिले गेले.

दस्त नोंदणी करताना संगणकावर या बोगस व्यक्तींचे फोटो घेऊन ओळख पटवून देणारे आणि साक्षीदार म्हणून चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव दोघे (रा. नेले ता. सातारा) हे होते. तसेच दस्त नोंदणीवेळी मारुती आणि मधूकर यदू पवार यांची बहिण या सहहिस्सेदार उपस्थित असताना त्यांनीदेखील जाणीवपूर्वक फसवणुकीत साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी संशयितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.