सातारा - विधानसभा निवडणूक आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या कराड येथील पथकाने छापा मारून एक चारचाकी, दोन दुचाकींसह मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मतदारांना प्रलोभन दाखवले जाऊ नये, यासाठी बेकायदेशीरपणे मद्यसाठा तसेच मद्याची वाहतूक आणि चोरट्या मद्य विक्रीवर उत्पादन शुल्क खात्याने नजर ठेवली आहे. त्यासाठी नेमलेल्या पथकाने आज (रविवार) चार ठिकाणी छापे मारले. या कारवाईत 60 लिटर देशी दारू, 110 लिटर ताडी तसेच एक चारचाकी मोटार, दोन मोटरसायकली मिळून 1 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - कराड नगरपालिकेतील २३ नगरसेवकांचा पृथ्वीराज चव्हाणांना धक्का.. डॉ.अतुल भोसलेंना पाठिंबा
याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाचे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. बी. जंगम, पी. ए. बोडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, जवान पी. आर. गायकवाड, व्ही. व्ही. बनसोडे, एस. आर. बक्केवाड, जे. एस. माने यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध