ETV Bharat / state

मद्यपी कारचालकाचा सातारा-पंढरपूर महामार्गावर थरार;  13 जणांना धडक - drink and drive news satara

एका मद्यपी कार चालकाने बुधवारी रात्री पंढरपूर-सातारा रस्त्यावर जवळपास १३ जणांना गाडीने ठोकल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मद्यपी चालकाचा पाठलाग करताना पोलीसांना चांगलाच घाम फुटला. शेवटी नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा थरार संपला.

मद्यपी कारचालकाने पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना चांगलाच धुमाकूळ घातला
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:20 AM IST

सातारा - मद्यपी कारचालकाने पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना चांगलाच धुमाकूळ घातला. उपरी (जि.सोलापूर) पासून सुरू झालेली धडकण्याची मालिका गोंदवल्यातील सतर्क नागरिकांमुळे संपल्याने पुढील अनर्थ टळला. या थरारात मद्यपी चालक हणमंत गेजगे याने १३ जणांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.

मद्यपी कारचालकाने पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना चांगलाच धुमाकूळ घातला

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथील मुख्य रस्ता सामसूम होत असतानाच अचानक मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधून एक चारचाकी वाहन रस्त्याने वाहनांना धडक येत असल्याची माहिती दिली.

यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला. या मद्यपीचे वाहन थांबवण्यासाठी सातारा-पंढरपूर रस्त्यावर धैर्यशील पाटील यांनी स्वतःचा डंपर आडवा उभा केला.

काही मिनिटांतच (एमएच 11 सीजी 3660) ही पांढऱ्या रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे मद्यपी चालकाला गाडी थांबवावी लागली. चालक गेजगे याने गाडी थांबवताच स्थानिकांनी गाडीभोवती गराडा घातला. याचवेळी पाटील यांनी चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली. यानंतर चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला.

त्याक्षणी या वाहनाचा पाठलाग करणारे पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चालकाला ताब्यात घेतले. संबंधित वाहनाचा म्हसवडमधूनच बंटी माने नामक व्यक्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील पाठलाग सुरू केला होता. मात्र, गोंदवल्यात हे वाहन थांबल्यानंतर त्यांचाही पाठलाग संपला.

दरम्यान, या वाहनाने विरकरवाडी(ता.माण)येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकला ताब्यात घेतले असून साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे अधिक तपास करत आहेत. या पाठलागात म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण, सुरज काकडे, संजय अस्वले, अनिल वाघमोडे सहभागी होते.

Intro:सातारा मद्यपी कारचालकाने पंढरपूर कडून साताऱ्याकडे येताना काल रात्री चांगलाच धुमाकूळ घातला. उपरी (जि सोलापूर) पासून सुरू झालेली मालिका गोंदवल्यातील सतर्क नागरिकांमुळे संपल्याने पुढील अनर्थ टळला. या थरारात मद्यपी चालक हणमंत गेजगे यांने तेरा जणांना ठोकरल्याची माहिती समोर येत आहे.

Body:रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथील मुख्य रस्त्यावर सामसूम होत चालली असतानाच अचानक मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भास्कर कट्टे यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधून एक चारचाकी वाहन रस्त्याने वाहनांना ठोकरत येत असल्याबाबतची माहिती दिली. यावेळी गोंदवल्यातील नागरिकांमध्ये ही बातमी समजताच भरधाव वेगाने अपघात करत निघालेल्या वाहनाला अडविण्यासाठीची धावपळ सुरू झाली.अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला. हे अपघाताला कारणीभूत असणारे वाहन थांबविण्यासाठी सातारा पंढरपूर या मुख्य रस्त्यावरच धैर्यशील पाटील यांनी स्वतःचा डंपर आडवा उभा केला.काही मिनिटातच एम एच ११ सी जी ३६६० ही पांढऱ्या रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली.त्याचक्षणी तातडीने ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे मद्यपी चालकाला गाडी थांबविण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे चालक गेजगे याने गाडी थांबविताच लोकांनी गाडीभोवती गराडा घातला. परंतु गाडीची दारे व काचा बंद असल्याने व वाहन सुरूच असल्याने धोका अधिकच वाढला होता. मात्र याचवेळी मोठ्या धाडसाने धैर्यशील पाटील यांनी गाडीच्या वर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली.चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला.याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीस देखील घटनास्थळी पोचले.लोकांनी या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.या अपघात करत आलेल्या वाहनाचा म्हसवडमधूनच बंटी माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील पाठलाग सुरू केला होता.मात्र गोंदवल्यात हे वाहन थांबविल्यानंतर त्यांचाही पाठलाग थांबला.

दरम्यान या वाहनाने विरकरवाडी(ता.माण)येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी संपूर्ण प्रवासादरम्यान आणखी किती जणांना अपघातग्रस्त केले आहे याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नव्हती.म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.या थरारक पाठलागात म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण,सुरज काकडे,संजय अस्वले,अनिल वाघमोडे सहभागी झाली होते.गोंदवल्यात या थरारक वाहनाबाबत माहिती समजताच लोकांनी मोठी गर्दी केली होती.

व्हिडीओ- भरधाव वाहन चालवत अपघात करत निघालेल्या वाहनाला ग्रामस्थांनी अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देत असतानाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.