ETV Bharat / state

काठीने मारहाण करून भटक्या कुत्र्यांना केले ठार; चौघांविरोधात गुन्हा दाखल

भटक्या कुत्र्यांना काठीने बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कराडमध्ये समोर आली. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्राणीप्रेमींमध्ये संताप होता. अखेर याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

stray dogs in satara
भटक्या कुत्र्यांना काठीने बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कराडमध्ये समोर आली.
author img

By

Published : Jun 19, 2020, 10:56 AM IST

Updated : Jun 19, 2020, 11:40 AM IST

सातारा - भटक्या कुत्र्यांना काठीने बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कराडमध्ये समोर आली. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्राणीप्रेमींमध्ये संताप होता. अखेर याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ओगलेवाडी-टेंभू मार्गावरील गजानन हौसिंग सोसायटीत क्रुरतेचा कळस झाला. भटक्या कुत्र्यांना काठीने बेदम मारहाण करून ठार करण्यात आले. याचे चित्रीकरण देखील करण्यात आले. सलीम छारानिया यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रकाशित केला. यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना देण्यात आली. त्यांनी या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले. चौकशी दरम्यान घटनेत तथ्य आढळल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

भटक्या कुत्र्यांना काठीने बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कराडमध्ये समोर आली.

याप्रकरणी संग्राम लक्ष्मण लाड, नीलम लक्ष्मण लाड, सूर्यकांत जयसिंग पाटील आणि गजानन जयसिंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते चौघेही गजानन हौसिंग सोसायटीतील रहिवासी आहेत.

Last Updated : Jun 19, 2020, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.