ETV Bharat / state

नरक चतुर्दशीच्या पहाटे २०० दुर्गप्रेमी सज्जनगडावर दाखल; उत्साहात दीपोत्सव साजरा

पहाटे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार तसेच बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत प्रेरणामंत्र, नाम जयघोष करून अंगलाई देवी मंदिरापासून धाब्याचा मारुती, श्रीराम मंदिर, समाधी मंदिर, पेठेतील मारूती ते छत्रपती शिवाजी महाद्वारापर्यंत मशाली पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

200 दुर्गप्रेमी सज्जनगडावर दाखल
200 दुर्गप्रेमी सज्जनगडावर दाखल
author img

By

Published : Nov 14, 2020, 7:36 PM IST

Updated : Nov 14, 2020, 7:59 PM IST

सातारा - दिवाळीत नरक चतुर्थी दिवशी 'एक दिवा शिवरायांच्या चरणी' या संकल्पनेची कास धरून आज दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून उत्साहात साजरा झाला. सातारा तालुक्यातील परळीच्या दऱ्याखोऱ्यातील सुमारे २०० हून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते.

पहाटे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार व श्री समर्थ महाद्वार तसेच बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत प्रेरणामंत्र, नाम जयघोष करून अंगलाई देवी मंदिरापासून धाब्याचा मारुती, श्रीराम मंदिर, समाधी मंदिर, पेठेतील मारूती ते छत्रपती शिवाजी महाद्वारापर्यंत मशाली पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघा सज्जनगड दुमदुमून गेला.

उत्साहात दीपोत्सव साजरा

किल्ल्याचे संवर्धन करण्याची तरुणाईची भावना-

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य स्थापनेसाठी सह्याद्रीच्या डोंगररांगावर असलेले सर्व गड किल्ले आपला इतिहास, आपली संस्कृती, स्वाभिमानाने व अभिमानाने जिवंत राहिली आहे. गड-किल्ल्यांची संख्या वाढवू शकत नसलो तरीही त्यांचे सौंदर्य संवर्धित करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, अशी येथील तरुणाईची भावना आहे. आपल्या वाट्याला जितके गड-किल्ले आहेत ते पुढच्या पिढीला सुस्थितीत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहनही यावेळी जमलेल्या शिवभक्तांनी केले.

दुर्ग संवर्धनाच्या अशाच मोहिमा भविष्यातही राबवणार असल्याचे दुर्गसंवर्धकांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी मावळ्यांनी दिलेल्या जय घोषणांनी सज्जनगड व परळी खोरे दुमदुमून गेले. दुर्गप्रेमी म्हणाले, शिवप्रेमींनी गडांची आपल्याला अनमोल देणगी दिली आहे. की प्रत्येक वर्षी दीपोत्सव साजरा करायचा आहे. एक दिवा सैनिकांसाठी व शिवरायांसाठी लावायचा आहे.

Last Updated : Nov 14, 2020, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.