ETV Bharat / state

मोकाट रेड्यांच्या बंदोबस्ताची काही योजना आहे का? नाव न घेता ठाकरे-राऊतांना उद्देशून फडणवीसांची खोचक टीका - Fadnavis Criticizes Thackeray

Fadnavis Criticizes Thackeray : मुंबईतील महापत्रकार परिषदेचा उल्लेख टाळून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (free buffaloes) सातारा जिल्ह्यातील कराडमधील कृषी प्रदर्शनात उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. (Devendra Fadnavis) त्यांचा बंदोबस्त करण्याची योजना इथल्या कृषी प्रदर्शनात असेल तर सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे-राऊतांचा समाचार घेतला. (Agriculture Exhibition Karad)

Devendra Fadnavis indirectly
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 5:57 PM IST

देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना

सातारा Fadnavis Criticizes Thackeray : भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. (Uddhav Thackeray) नामोल्लेख टाळून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फडणवीसांनी मोकाट रेडे म्हटले. तसंच इथल्या कृषी प्रदर्शनात सर्वांत उंच बैल, दोन टनाचा रेडा असं बरंच काही आहे. आमच्याकडे मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना या प्रदर्शनात आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला. (Sanjay Raut)

रणजी नव्हे ही आयपीएलची टीम : दुरवस्था झालेल्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला उर्जितावस्थेत आणून तुमच्या उपस्थितीत रणजीची पहिली मॅच व्हावी, असं खासदार उदयनराजे भोसले आपल्या भाषणात म्हणाले होते. तो धागा पकडून फडणवीस म्हणाले की, राजे ही रणजीची टीम नाही. आयपीएलची टीम आहे. त्याचे मालक पण तुम्हीच आहात. त्यामुळं तुम्ही टीममध्ये आहातच. फक्त आम्हाला टीममध्ये ठेवा. फडणवीसांच्या या बोलण्यावर जोरदार हशा पिकला.

दुष्काळाचा कलंक पुसून टाकणार : कृष्णा-कोयनेवरील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. आमदार जयकुमार गोरेंनी हाती घेतलेल्या कामांमुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांवरील दुष्काळी हा शिक्का नक्की पुसला जाईल. सत्तेत असताना साखर उद्योगातील ज्या लोकांना निर्णय घेणे जमले नाही ते निर्णय मोदींनी घेतले, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका केली.

देवेंद्रजी उद्या राज्याचा कासरा तुम्हाला हाती घ्यायचाय : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले यांना बैलगाडीतून कृषी प्रदर्शनस्थळी आणण्यात आलं. या अनुषंगाने उदयनराजे म्हणाले, देवेंद्रजी आज आपण हातात कासरा धरून बैलगाडी चालवली; परंतु उद्या तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे. शिवाजी स्टेडियम ऊर्जितावस्थेत आणून पहिली रणजीची मॅच आपल्या उपस्थितीत व्हावी. फक्त आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या. रिझर्व्ह ठेऊ नका, अशी उदयनराजेंनी कोटी करताच फडणवीसांना हसू आवरले नाही.

सातारा पूर्वीसारखा कुणाचा बालेकिल्ला नाही : सातारा जिल्हा आता कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही, असं सांगत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. समाजात काम करणाऱ्या लोकांकडे जनतेचं लक्ष असतं. त्यामुळे निवडणुकीत लोक महायुतीच्या बाजूनं उभे राहतील. येत्या लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर सर्व ४८ जागा निवडून येतील, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

हेही वाचा:

  1. उद्धव ठाकरे संभ्रम निर्माण करताहेत, आव्हाडांचा बोलविता धनी दुसराच - अब्दुल सत्तार
  2. पंजाबमध्ये धुक्याचा कहर! रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसची धडक ; चार पोलिसांचा मृत्यू
  3. काय सांगता! प्रवाशानं चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून केला प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.