ETV Bharat / state

मे महिन्यात एक टीएमसी पाणी सोडूनही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणखी पाणी सोडण्याची मागणी - पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली

कोयना धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने यापूर्वीच केली होती. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच १ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे पुन्हा तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

कोयना धरण
कोयना धरण
author img

By

Published : Jun 2, 2023, 1:00 PM IST

सातारा - तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा उत्तर कर्नाटकात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. कोयना धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने यापूर्वीच केली होती. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच १ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्यात आले आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे पुन्हा तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

कधी सोडले पाणी? - कर्नाटक सरकारकडून पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली होती. सरकारचा आदेश मिळताच कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिटमधून २१०० क्युसेक्स आणि कोयना धरणाच्या विमोचकाव्दारे २१०० क्युसेक्स असा एकूण ४२०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. कर्नाटक सरकारने ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यापैकी एक टीएमसी पाणी सोडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली होती. ते पाणी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्राला दुजाभाव - महाराष्ट्रातून पाणी पाहिजे असल्यास कर्नाटक पाण्याची मागणी करते. मात्र महाराष्ट्रात पूर परिस्थिती असल्यावर कर्नाटकातील धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी चालढकल केली जाते असा अनुभव आहे. त्यामुळे आता राज्यसरकार काय भूमिका घेते याकडे लोकांचे लक्ष आहे.

कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष सुरू - कालपासून (दि. १ जून) कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष सुरू झाले आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना प्रकल्पाने कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू झाले आहेत.

पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली - सिंचनासाठी आणि पिण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सकाळी विमोचकातून ५०० क्युसेक, असा एकूण २६०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.

कोयना धरणात १६ टक्केच पाणी - कोयना धरणात केवळ १६ टक्के ( १७.५२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्याची पातळी ६२४६६ मीटर आहे. पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक आणि विमोचकातून १०४०, असा एकूण ३१४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाऊस लांबल्यास वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.