ETV Bharat / state

निष्ठावान कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम; 10 रुपयांची नाणी साठवून 5 हजार रुपये दिले अर्ज भरायला - depositing Rs 5 thousand by coins of 10 rupees in patan taluka satara district

पाटण तालुक्यातील डोगरी भागात असलेल्या तेटमेवाडी गावातला हा प्रकार आहे. सुनील तेटमे असे त्या निष्ठावान कार्यकर्त्याचे नाव आहे.

निष्ठावान कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम
author img

By

Published : Oct 2, 2019, 10:45 PM IST

सातारा - एका कार्यकर्त्याने आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार सलग पाच वर्षे किराणा दुकानात आलेले दहा रुपयांची नाणी साठवून पाच हजार रुपयांची रक्कम पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना अनामत रक्कम भरण्यासाठी दिली आहे. तालुक्यातील डोगरी भागात असलेल्या तेटमेवाडी गावातला हा प्रकार आहे. सुनील तेटमे असे त्या निष्ठावान कार्यकर्त्याचे नाव आहे.

हेही वाचा - गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक

दुर्गम आणि डोंगरी अशी ओळख असलेला पाटण विधानसभा मतदारसंघ हा अनेक कारणांमुळे राज्यभर चर्चेत असतो. या मतदारसंघात ग्रामपंचायतीची निवडणूक असो अथवा सोसायटीची, प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची आणि संघर्षमय असते. अगदी मागील काही विधानसभा निवडणुकीचे जय-पराजय साडे पाचशे-सातशे इतक्या कमी फरकाने लागले आहेत. यावरून पाटण तालुक्यातील राजकीय संघर्षाचा अंदाज येईल.

हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'

लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई आणि दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्यानंतर पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांच्या रूपाने लोकनेत्यांची तिसरी पिढी पाटण तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाली. तेव्हापासून विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई गटामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि पाटणकर राष्ट्रवादीत गेले. शंभूराज देसाई यांनीही शिवसेनेची वाट धरली आणि प्रवेश करताच सहकार परिषदेचे अध्यक्षपदही मिळवले. 2004 ला पहिल्यांदा शंभूराज देसाई आमदार झाले. मात्र, 2009 ला पाटणकरांनी त्यांचा पराभव केला. पुन्हा 2014 ला शंभूराज देसाईंनी मोठ्या मताधिक्क्याने बाजी मारली. अशा अटीतटीच्या संघर्षामुळे वर्षभर पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण गरम असते.

हेही वाचा - गांधी@१५० : पंतप्रधान मोदी यांनी केली 'ईटीव्ही भारत'च्या गीताची प्रशंसा

या तालुक्यातील डोगरी विभागात असलेल्या तेटमेवाडी गावातील पाटणकरांच्या एका निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्त्याने 2019 च्या निवडणुकीसाठी आपल्या नेत्याला अर्थिक मदत करण्याचा निश्चय केला होता. तशी इच्छा त्यांनी मुलगा सुनील तेटमे याच्याकडे बोलून दाखवली होती. म्हणून सुनील तेटमे गेली पाच वर्षे आपल्या किराणा दुकानात गिर्‍हाईकाकडून येणारे दहा रूपयांचे नाणी (ठोकळे) साठवत होते. पाच वर्षात त्यांच्याकडे पाच हजार रुपयांचे दहाचे नाणी साठली होती. मागील महिन्यात त्यांचे वडील आजारी पडले. त्यांचे ऑपरेशन झाले. त्यासाठी पैशाची गरज असतानाही सुनील तेटमे यांनी इतरांकडून पैसे उसने घेतले. मात्र, साठवलेल्या पैशाला हात लावला नाही. त्यावेळीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आता निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असल्याने सुनील तेटमे यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम भरण्यासाठी साठवलेल्या दहा रूपयांच्या नाण्यांच्या पाच हजाराची रक्कम सत्यजित पाटणकरांकडे सुपूत्र करून वडिलांची इच्छापूर्ती केलीच. शिवाय नेत्यावरील निष्ठेचे उदाहरणही इतरांपुढे ठेवले आहे.

Intro:सातारा (कराड) एका कार्यकर्त्याने आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार सलग पाच वर्षे किराणा दुकानात आलेले दहाचे डॉलर साठवून पाच हजार रूपयांची रक्कम पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना अनामत रक्कम भरण्यासाठी दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. Body:पाटण तालुका जरी दुर्गम आणि डोंगरी असला, तरी विक्रमसिंह पाटणकर-शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्ष मात्र भलताच टोकाचा असतो. 
दुर्गम आणि डोंगरी अशी ओळख असलेला पाटण विधानसभा मतदार संघ हा अनेक कारणांमुळे राज्यभर चर्चेत असतो. या मतदार संघात ग्रामपंचायतीची निवडणूक असो अथवा सोसायटीची. प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची आणि संघर्षमय असते. अगदी मागील काही विधानसभा निवडणुकीचे जय-पराजय साडे पाचशे-सातशे इतक्या कमी फरकाने लागले आहेत. यावरून पाटण तालुक्यातील राजकीय संघर्षाचा अंदाज येईल. लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्यानंतर पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांच्या रूपाने लोकनेत्यांची तिसरी पिढी पाटण तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाली. तेव्हापासून विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई गटामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि पाटणकर राष्ट्रवादीत गेले. शंभूराज देसाई यांनीही शिवसेनेची वाट धरली आणि प्रवेश करताच सहकार परिषदेचे अध्यक्षपदही मिळविले. 2004 ला पहिल्यांदा शंभूराज देसाई आमदार झाले. मात्र, 2009 ला पाटणकरांनी त्यांचा पराभव केला. पुन्हा 2014 ला शंभूराज देसाईंनी मोठ्या मताधिक्क्याने बाजी मारली. अशा अटीतटीच्या संघर्षामुळे वर्षभर पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण गरम असते. 
 या तालुक्यातील डोगरी विभागात असलेल्या तेटमेवाडी गावातील पाटणकरांच्या एका निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्त्याने 2019 च्या निवडणुकीसाठी आपल्या नेत्याला अर्थिक मदत करण्याचा निश्चय केला होता. तशी इच्छा त्यांनी मुलगा सुनील तेटमे याच्याकडे बोलून दाखविली होती. म्हणून सुनील तेटमे गेली पाच वर्षे आपल्या किराणा दुकानात गिर्‍हाईकाकडून येणारे दहा रूपयांचे डॉलर (ठोकळे) साठवत होते. पाच वर्षात त्यांच्याकडे पाच हजार रूपयांचे दहाचे डॉलर साठले होते. मागील महिन्यात त्यांचे वडील आजारी पडले. त्यांचे ऑपरेशन झाले. त्यासाठी पैशाची गरज असतानाही सुनील तेटमे यांनी इतरांकडून पैसे उसने घेतले. मात्र, साठविलेल्या पैशाला हात लावला नाही. दुर्दैवाने त्यांच्या वडीलांचे निधन झाले. आता निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असल्याने सुनील तेटमे यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उमेदवारी अर्जाची अनामत  रक्कम भरण्यासाठी साठविलेल्या दहा रूपयांच्या डॉलरही पाच हजाराची रक्कम  सत्यजित पाटणकरांकडे सुपूत्र करून वडीलांची इच्छापूर्ती केलीच. शिवाय नेत्यावरील निष्ठेचे उदाहरणही इतरांपुढे ठेवले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.