ETV Bharat / state

Satara news : निष्णात फौजदारी विधिज्ञ अ‍ॅड.धैर्यशील पाटील यांचे निधन - Red Mark Party

साताऱ्यातील निष्णात फौजदारी विधिज्ञ अ‍ॅड.धैर्यशील पाटील ( Death of Expert criminal lawyer ) यांचे बुधवारी सकाळी साताऱ्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. सातार्‍यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील खून खटला, यासह महाराष्ट्रातील अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांचे काम (Criminal case work)त्यांनी पाहिले होते. (Expert criminal lawyer Adv. Dhairyasheel Patil passed away)

Adv. Dhairyasheel Patil in satara
अ‍ॅड.धैर्यशील पाटील यांचे निधन
author img

By

Published : Sep 14, 2022, 5:57 PM IST

सातारा - बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी सदस्य, साताऱ्यातील निष्णात फौजदारी विधिज्ञ अ‍ॅड.धैर्यशील पाटील ( Death of Expert criminal lawyer )यांचे बुधवारी सकाळी साताऱ्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले (Expert criminal lawyer Adv. Dhairyasheel Patil passed away) . ते ८० वर्षांचे होते. सातार्‍यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील खून खटला, यासह महाराष्ट्रातील अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात कार्यरत होते.

निधनानंतर सातारकरांवर पसरली शोककळा : अ‍ॅड.डी.व्ही. पाटील यांचा जन्म १४ जुलै १९४३ रोजी बडोदा येथे झाला. इस्लामपूर जवळील पेठ हे त्यांचे मूळ गाव. वकिलीची पदवी घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यासह देशभर त्यांनी विविध खटल्यांचे काम पाहिले. फौजदारी संहितेवर त्यांची कमालीची पकड होती. त्यांच्या निधनाने सातारकरांवर शोककळा पसरली आहे. सायंकाळी पाच वाजता सदरबझारमधील निवासस्थानापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात अ‍ॅड.दीपा पाटील, मुलगा अ‍ॅड.सिध्दार्थ पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

डाव्या विचारसरणीचा होता पगडा : गोरगरीब, कष्टकरी व श्रमिकांसाठी त्यांनी मोठे काम केले. डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. श्रमिक संघ, श्रमिक महासंघ, लाल निशाण पक्षाचे ( Red Mark Party ) ते सदस्य होते. सातारा विभाग एसटी कामगार संघटना, सातारा म्युनिसिपल कामगार युनियनचे ते अध्यक्ष आणि कॉम्रेड व्ही. एन. पाटील स्मारक समितीचे ते सदस्य सचिव होते. धरणग्रस्त चळवळ, दुष्काळग्रस्तांच्या पाणी चळवळीसह साताऱ्यातील पुरोगामी चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.