ETV Bharat / state

होम कॉरंनटाईन केलेल्या पाचगणीतील मुंबईकर महिलेचा मृत्यू

पाचगणी गिरीस्थानावर होम कॉरंटाईन केलेल्या मुंबईकर महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ती महिला राहत असलेला विभाग दक्षता म्हणून बॅरिकेटने बंद केला आहे.

author img

By

Published : May 23, 2020, 5:38 PM IST

Death of a home quarantined woman in pachgani
होम कॉरंनटाईन केलेल्या पाचगणीतील मुंबईकर महिलेचा मृत्यू

सातारा - पाचगणी गिरीस्थानावर होम कॉरंटाईन केलेल्या मुंबईकर महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ती महिला राहत असलेला विभाग दक्षता म्हणून बॅरिकेटने बंद केला आहे. त्यामुळे पाचगणीकर धास्तावले आहेत. त्या महिलेचा रिपोर्ट चाचणीसाठी पाठवला आहे, अद्याप तो आलेला नाही.

पाचगणी शहरातील सिद्धार्थनगरमध्ये एक ६४ वर्षीय महिला 4 दिवसांपूर्वी वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आली. तिला पालिका व आरोग्य विभागाने नियमाप्रमाणे गृह विलगीकरणात ठेवले होते. या महिलेचा काल (शुक्रवार) रात्री अचानक मृत्यू झाला. त्यामुळे पाचगणीत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आणि सिद्धार्थनगरात प्रांत, तहसीलदार, मुख्याधिकारी सर्वजण सकाळीच दाखल झाले. हा मृत्यू कशाने झाला? कोरोनाची लागन झाली होती काय? याबाबत तर्क वितर्क सुरू झाले. आरोग्य विभाग रोज या महिलेची तपासणी करत होते. परंतु, या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून संशयीत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी सांगितले.

या घटनेने पाचगणीकर हादरून गेले असून पालिकेने सिद्धार्थनगर येथे निर्जतुकीकरंण औषधांची फवारणी केली आहे. सिद्धार्थनगर विभाग दोन्ही बाजूने बॅरॅकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि कुणाच्याही घरी जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. सदर महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून, महिलेवर कोव्हीड नियमानुसार पाचगणीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी सांगितले.

सदर महिलेचा मृत्यू कशाने झाला हा प्रश्न पाचगणीकरांच्या मनात कायम राहिला आहे. कोरोनाचे संकट पाचगणीत दाखल झाल्याने लोक धास्तावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.