ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग मंदावला

सातारा जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग मंदावला असून गेल्या 24 तासांत 881 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले.

corona
कोरोना
author img

By

Published : Jun 11, 2021, 2:08 PM IST

सातारा - जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग मंदावला असून गेल्या 24 तासांत 881 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. तर 28 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.

वाढ खुंटली

काल आलेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक 178 रुग्ण आढळले. तर जावळीत 25, कराड 179, खंडाळा 108, खटाव 134, कोरेगाव 66, माण 43, महाबळेश्वर 2, पाटण 40, फलटण 62, वाई 35 व इतर 9 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 78 हजार 232 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 7 हजार 500 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 881 बाधित निघाले.

बाधितांचा दर 11.75 टक्के इतका आहे.

10 हजार 774 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये कराड 11, खटाव 3, कोरेगाव 3, माण 2, फलटण 1, पाटण 2, सातारा 6 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 968 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 774 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

1 हजार 453 नागरिकांना डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसी मध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1 हजार 453 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 63 हजार 439 नागरीक या आजारातून बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.