सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाने आणखी 40 जणांचे बळी घेतले. त्यामुळे कोरोना संसर्गाने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे आहे. गुरुवारी हाती आलेल्या अहवालानुसार आणखी 2 हजार 292 नागरिक कोरोनाबाधित आढळले.
टक्केवारी 34 च्या वर
गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात रोजची कोरोना बाधितांची टक्केवारी 35 पर्यंत पोहोचली आहे. रोजचा बाधितांचा आकडा 2 हजारांच्या पुढे गेला आहे. मृतांचे प्रमाणही वाढले आहे. ही संख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1 हजार 595 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा तालुका नियंत्रणाबाहेर
तालुकानिहाय गुरुवारच्या कोरोनाबाधितांची संख्या, तर कंसामध्ये आज अखेर एकूण बाधित रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे.
जावळी 92 (5527), कराड 279 (17285), खंडाळा 81 (7139), खटाव 312 (10035), कोरेगांव 127 (9743),माण 179 (7467), महाबळेश्वर 36 (3468), पाटण 144 (4827), फलटण 392 (15175), सातारा 483 (26393), वाई 147 (8731 ) व इतर 20 (627) असे आज अखेर एकूण 1 लाख 16 हजार 417 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांमध्येही सातारा तालुका
गुरुवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्येत सातारा तालुक्यातील आकडा जास्त आहे. गुरुवारी जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले मृत्यू, कंसात एकूण मृत्य पुढील प्रमाणे.
जावळी 2 (108), कराड 6 (475), खंडाळा 4 (92), खटाव 3 (281), कोरेगांव 4 (253), माण 1 (152), महाबळेश्वर 0 (34), पाटण 0 (123), फलटण 3 (197), सातारा 12 (805), वाई 5 (220) , असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 740 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
* एकूण बाधित -1 लाख 16 हजार417
* घरी सोडण्यात आलेले - 92 हजार 79
* मृत्यू - 2 हजार 740
* उपचाराधिन रुग्ण-21 हजार 571