ETV Bharat / state

काँग्रेसला लवकरच मिळणार पूर्णवेळ अध्यक्ष - काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष ब्रेकिंग न्यूज

'काँग्रेसला लवकरच पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल. त्यासाठी काँग्रेसमध्ये निवडणुकाही होतील', असे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

कराड
कराड
author img

By

Published : Jul 18, 2021, 8:14 PM IST

कराड/सातारा - 'काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुका 22 जूनला घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका अथवा निवड, यापैकी एका माध्यमातून लवकरच काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल', अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

चव्हाणांचे हायकमांडला पत्र, काँग्रेसमध्ये निवडणुका होणार?

'सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपद स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे, यासंदर्भात चर्चेसाठी आम्ही वेळ मागितली होती. परंतु, सोनिया गांधींची तब्येत बरी नसल्याने आणि कोरोनामुळे वेळ मिळू शकली नाही. महिनाभर आम्ही वाट पाहिली. आपले विचार त्यांच्यापर्यंत पाहोचले पाहिजेत म्हणून आम्ही 5 ऑगस्ट 2020 रोजी गोपनीय पत्र त्यांना पाठवले होते. परंतु, पक्षातील कोणीतरी ते लिक केले. त्यामुळे गैरसमज झाला. मात्र, त्यानंतर सोनिया गांधींनी सात जणांना बोलावून घेतले. आम्ही सात आणि सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियांका गांधींसह सात, अशा एकूण 14 जणांची पाच तास बैठक झाली. पत्रामध्ये आम्ही मांडलेल्या पक्षांतर्गत मुद्यांवर सखोल चर्चा झाली. त्यातील बहुतांश मुद्दे त्यांनी मान्य केले. त्यामध्ये निवडणुका घेण्याचा महत्वाचा मुद्दा देखील त्यांनी मान्य केला', असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

'लवकरच काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळेल'

'बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे 22 जूनला निवडणुका घेण्याचे ठरले होते. परंतु, कोविडमुळे त्या पुढे गेल्या. परंतु, बैठकीत आमचे बहुतांश मुद्दे सोनिया गांधींनी मान्य केले आहेत. कमलनाथ यांची काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी मीडियात सुरू असलेली चर्चा त्या अनुषंगाने असावी. प्रत्यक्षात काय घडतेय ते थोड्या दिवसातच कळेल. मात्र, लवकरच काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल', असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारवर चव्हाणांचा हल्लाबोल -

'कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडलीय'

'दुर्दैवाने आज मोदी सरकारच्या काळात या सर्व चौकशा सोडल्या आहेत. एखाद्याच्या अंगावर कुत्रा सोडल्यासारख्या चौकशा सुरू करायच्या आणि अंतिम निर्णय कुठेच घ्यायचा नाही. अशा पद्धतीने केंद्राकडून ईडीच्या चौकशा सुरू आहेत', असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांना केला आहे.

'फक्त ब्लॅकमेलिंगसाठी चौकशीचा वापर'
'चौकशी कशा व्हायला पाहिजेत. एखादा गुन्हा घडला असेल तर त्या गुन्हेगाराला योग्य न्यायप्रक्रिया झाल्यानंतर शिक्षा व्हायला पाहिजे. हे कुठेही आज होताना दिसत नाही. अनेक जणांना तुरुंगात टाकले. काहींवर धाडी टाकण्यात आल्या. तर काहींवर कारवाई देखील करण्यात आली. पण शेवटी काहीही होताना दिसत नाही. ज्यांनी पक्ष बदलला, त्यांची चौकशा होत आहे. एखादा व्यक्ती दोषी असेल तर त्याला न्यायप्रक्रिया करून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देऊन मग न्यायालयाने शिक्षा दिली पाहिजे. आता या चौकशी समितीचा फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी उपयोग होत आहे', असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

'उद्धव ठाकरेंना आता पंतप्रधान केलं पाहिजे'

'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रीय आहेत. तसा सर्व्हेही झाला आहे. आता त्यांना पंतप्रधान केले पाहिजे. लोकाभिमुख प्रशासन देणे हे शक्य आहे आणि ते करताही येते. मोदींची फक्त प्रसिद्धी आहे. मोदींच्या अकार्यक्षमामुळे आज देशात किती लोकांचे नाहक प्राण गेले. हे आपल्याला कळणार नाही', असेही चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईत पावसामुळे 21 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.