ETV Bharat / state

अपघाती मृत्यूबद्दल ट्रक चालकाच्या वारसांना तब्बल 1 कोटी 15 लाखांची नुकसान भरपाई - ट्रक चालकाला 1 कोटीची नुकसान भरपाई

अपघाती मृत्युमुळे समोरच्या ट्रकचा मालक आणि विमा कंपनीकडून 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. ही रक्कम जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई आहे.

सातारा
सातारा
author img

By

Published : Apr 21, 2021, 8:30 PM IST

सातारा - ट्रक चालकाच्या अपघाती मृत्युमुळे समोरच्या ट्रकचा मालक आणि विमा कंपनीकडून 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. ही रक्कम जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई आहे.

सातारा

मृत ट्रक चालक-मालक संजय सखाराम पवार (रा. परखंदी, ता. माण) यांच्या वारसांतर्फे नुकसान भरपाईच्या दाव्याचे काम अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी पाहिले. त्यांनी सांगितले की, संजय पवार यांनी सन 2008 मध्ये 10 चाकी कंटेनर ट्रक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा रुपये 35,000 इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. संजय यांचे कुटुंब कळंबोली, मुंबई येथे भाड्याच्या घरात राहत होते. संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करून संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये 66 हजार इतके होत असल्याने एकूण 1 कोटी 44 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पवार कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती.

या दाव्याच्या कामी कंटेनर ट्रकच्या कर्ज खात्याचा उतारा, ट्रकच्या मालकीचे रस्ते वाहतूक परिवहनचे (आर.टी.ओ) दाखले इत्यादी कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. हा पुरावा आणि सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय यांचा विचार करून सातारा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. अभंग यांनी अंतिम निर्णय देवून वारसांना एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही नुकसान भरपाई ट्रक चालक-मालकाच्या अपघाती मृत्यूबद्दलच्या दाव्यामध्ये आजपर्यंतच्या सातारा जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई ठरली आहे.

हेही वाचा - नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा- रामदास आठवले

हेही वाचा - नाशिक येथील दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न, घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.