ETV Bharat / state

साताऱ्यात अशीही एक प्रथा, मेढरांना रंगरंगोटी करुन मिरवणूक - साताऱ्यात मेढरांना रंगरंगोटी

माण तालुक्यातील‌ गटेवाडी, नरबटवाडी, पुकळेवाडी, बनगरवाडी, मासाळवाडी, विरकरवाडी अशी अनेक गावे धनगर समाजाच्याच लोकसंख्येची आहेत. या समाजाचा मेष पालन हाच पारंपारिक व्यवसाय असल्याने येथे दरवर्षी मेंढरे पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

पाडव्या‌ निमित्त‌‌ मेढरांना रंगरंगोटी करुन गावातून मिरवणूक
author img

By

Published : Oct 29, 2019, 6:19 AM IST

सातारा - भारतातील प्रत्येक गावाचे काहीनाकाही वैशिष्ठ्य असते. साताऱ्यामधील माण तालुक्यातही अनेक गावे आपल्या विविध परंपरांमुळे ओळखली जातात. या माण तालुक्यात दिवाळी - पाडव्यानिमित्त मेढरांना रंगरंगोटी करुन गावातून मिरवणूक काढण्याची‌ पारंपारिक प्रथा आजही सुरु आहे.

साताऱ्यात मेढरांना रंगरंगोटी करुन मिरवणूक

हेही वाचा - अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार - जिल्हाधिकारी

माण तालुक्यातील‌ गटेवाडी, नरबटवाडी, पुकळेवाडी, बनगरवाडी, मासाळवाडी, विरकरवाडी अशी अनेक गावे धनगर समाजाच्याच लोकसंख्येची आहेत. या समाजाचा मेष पालन हाच पारंपारिक व्यवसाय असल्याने येथे दरवर्षी मेंढरे पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

यंदाही दिवाळी पाडव्या‌‌ निमित्त गावातील मेंढरे रंगवून आणि कळपा- कळपाने मिरवणूक काढुन येथील ग्रामदैवत मंदीर परिसरास प्रदक्षिणा घालण्यात आली.
मेंढरांचे कळप पळविण्याच्या (शर्यतीचे) आयोजन करण्यात आले होते. मेंढरांना स्पर्धेत स्फूर्ती देण्यासाठी हलगी ताशा‌ ही वाद्येही वाजविण्यात आली. वरकुटे-मलवडी येथेही विविध मान्यवरांच्या उपस्थित याच पध्दतीने मेंढरे पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Intro:सातारा दिवाळी पाडव्या‌ निमित्त‌‌ माणदेशातील अनेक गावात मेढरांना रंगरंगोटी करुन गावातून मिरवणूक काढण्याची‌ पारंपारिक प्रथा आजही सुरु आहे.
Body:या तालुक्यात धनगर समाजाची कुटुंबे गावोगावी आहेत व या समाजाचा मेष पालन हाच पारंपारिक व्यवसाय आहे.
तालुक्यातील‌ गटेवाडी, नरबटवाडी, पुकळेवाडी, बनगरवाडी, मासाळवाडी, विरकरवाडी अशी अनेक गावेच्या गावे बहुतांश धनगर समाजाच्याच लोकसंख्येची आहेत.

आज दिवाळी पाडव्या‌ निमित्त गटेवाडी येथे आज दिवाळी पाडव्या‌‌ निमित्त गावातील मेढरे रंगवून कळपा- कळपाने मिरवणूक काढुन येथील ग्रामदैवत मंदीर परिसरास प्रदक्षणा घालण्याची‌ मेंढरांचे कळप पळविण्याच्या (शर्यतीचे) आयोजन करण्यात आले होते.यावेळी हलगी ताशा‌ हरि वाद्ये मेंढरांना स्पर्धेत स्फूर्ती देण्यासाठी वाजविण्यात आली

वरकुटे-मलवडी येथेही याची पध्दतीने मेढरे पळविण्याच्या स्पर्घांचे विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले होतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.