ETV Bharat / state

विशेष : विश्व विक्रमासाठी बालवैज्ञानिक सज्ज, साताऱ्यातील चौघांचा सहभाग - स्पेस झोन इंडिया बातमी

येत्या 7 फेब्रुवारीला जागतिक विक्रमाची मोहर उमटवण्यासाठी या बाल वैज्ञानिकांसह 'गिनीज बुक ऑफ वल्ड रेकाॅर्ड'च्या पथकाची जय्यत तयारी सुरू आहे. हे उपग्रह बनविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आठ विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यातील 4 बालवैज्ञानिक साताऱ्याचे आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 25, 2021, 5:06 PM IST

Updated : Jan 25, 2021, 5:25 PM IST

सातारा - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत 100 उपग्रह तयार करण्यात येत आहेत. 7 फेब्रुवारीला जागतिक विक्रमाची मोहर उमटवण्यासाठी या बाल वैज्ञानिकांसह 'गिनीज बुक ऑफ वल्ड रेकाॅर्ड'च्या पथकाची जय्यत तयारी सुरू आहे. हे उपग्रह बनविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आठ विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यातील 4 बालवैज्ञानिक साताऱ्याचे आहेत.

बातचित करताना प्रतिनिधी

हे आहेत विद्यार्थी वैज्ञानिक

7 फेब्रुवारीला रामेश्वरम (तामिळनाडू) येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत शंभर उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूलची वैष्णवी गायकवाड, 'एलबीएस' काॅलेजचा ललीत वाडेकर, शिरवळच्या ज्ञानसंवर्धिनी विद्यालयातील अथर्व नेवसे, कराड तालुक्यातील उंडाळे येथील दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राजवर्धन पाटील यांचा समावेश आहे. कोल्हापुरातील श्री हणमंत चाटे हायस्कुलचा पार्थ पाटील, डॉ. सायरस पुनावाला स्कूल पेठ,वडगाव येथील महम्मद जहीद मुनीर मोमीन, अथर्व कदम, रत्नागिरीचा सियाग परुळेकर या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. राज्यातील 375 विद्यार्थी यात सहभागी झालेत.

शंभर उपग्रह कशासाठी?

जगात सर्वात कमी वजनाचे (25 ग्रॅम ते 80 ग्रॅम ) शंभर उपग्रह बनवून, त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्यूड सायन्टिफिक बलून द्वारे प्रस्थापित केले जाईल. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडाय ऑक्साइड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या पेलोड सोबत काही झाडांच्या बीया सुद्धा पाठवण्यात येत आहे. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल.

मराठीतून प्रशिक्षण

शंभर पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेले जातील. ते निर्धारीत कालावधीत पुन्हा पृथ्वीवर उतरतील. या मोहिमेमुळे 'स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज' प्रकारचा उपग्रह म्हणजे काय. त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच दिली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृती

डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचे जतन करत विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्य व संशोधक वृत्तीचा विकास करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. भविष्यात करियर बनविताना त्यांना नक्की याचा फायदा होईल. हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे रामेश्वरम येथून राबविला जात असल्याचे महाराष्ट्र राज्य समन्वयक मनिषा चौधरी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

निमशहरी व ग्रामीण भागातील गुणवत्ता बाहेर काढण्याबरोबरचे स्पेस टेक्नॉलॉजीत विद्यार्थ्यांची आवड निर्माण करण्यासाठी हा उत्तम प्रकल्प आहे. याद्वारे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात असलेली संधी हेरून विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करणे शक्य होईल, असे मत साताऱ्यातील शिक्षण समुपदेशक गजानन वाडेकर यांनी व्यक्त केले.

Last Updated : Jan 25, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.