सातारा - पुरामुळे ऊसाचे नुकसान होत असेल तर भाताचे पीक घ्या, असा सल्ला पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाने शेतकऱ्यांना दिला. या सल्ल्यामुळे काही शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी पथकाने त्यांच्या जखमेवरच मीठ चोळण्याचे काम केले आहे.
केंद्रीय पथकाने तांबवे गावाला भेट दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाने पाहणी केली. पूर बाधितांना सध्या नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा होती. मात्र, अशात त्यांना दिलासा देण्याऐवजी ऊसाचे नुकसान होत असेल तर भाताचे पीक घ्या, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला गेला. त्यामुळे पथकाच्या या पोरकटपणामुळे शेतकरी संतप्त झाले होते.