ETV Bharat / state

जनसंघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक - नाना पटोले

जातीपातीत संघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याचे मत विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

caste-wise-census-necessary-to-avoid-mass-conflict-said-nana-patole-in-satara
जनसंघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक- नाना पटोले
author img

By

Published : Nov 9, 2020, 4:19 PM IST

सातारा - जनसंघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. जातीपातीत संघर्ष टाळण्यासाठी मी पुढाकार घेऊन विधानसभेला पटवून दिले, असे मत विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी व्यक्त केले. मुंबईकडे जात असताना ते सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेऴी ते बोलत होते.

नवीन पिढीने काँग्रेसचा इतिहास दुर्लक्षित करु नये-

विधानसभेच्या अध्यक्षांचा नवीन परिचय माझ्या कामातून करून देणार आहे. लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत माझे अधिकार लोकांसाठी वापरून त्यांचा त्रास कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. विधानसभेचे अध्यक्ष राज्यात कोणकोणते उपक्रम राबवू शकतात, हे दाखविण्याची संधी मला सभागृहाने दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव नसता, तर मी राज्यभरात दौरा आखला होता. महाराष्ट्रात राज्य स्थापनेपूर्वीपासून यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आदी जेष्ठ नेत्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत आपल्या वैचारिक विविधतेने राज्यात मोठा विकास केला. नवीन पिढीने हा इतिहास दुर्लक्षित करता कामा नये. मात्र, सध्या हा विकास दुर्लक्षित करून काँग्रेसची निंदा करून पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून सुरु आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन राज्य व देश विकासातील काँग्रेसचे योगदान लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

कोरोना प्रदुर्भावाने राज्याचे मोठे नुकसान-

लोकांचे प्रश्न ताबडतोबीने सुटण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा आळस झटकण्याची गरज आहे. यासाठी या यंत्रणेच्या प्रमुखाला म्हणजे मुख्य सचिवांनाच का जबाबदार धरू नये, असे मंत्रिमंडळाला सुचविणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. कोरोना प्रदुर्भावाने राज्याचे खूप मोठे नुकसान केले आहे. हा संसर्ग किती दिवस त्रास देणार आहे, ते माहित नाही. यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा- 'तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे हात-पाय तोडून थेट स्मशानात पाठवू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.