ETV Bharat / state

सातारा: वनपालावर खंडणीचा गुन्हा, युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली होती धमकी

गावितने कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो, असेही धमकावले. तसेच, रात्रीच्या सुमारास साताऱ्यातील गोडोली नर्सरीत डांबून दांडक्याने ओंकारला मारहाण देखील करण्यात आली.

वनरक्षक महेश सोनावले
वनरक्षक महेश सोनावले
author img

By

Published : Sep 6, 2020, 10:21 PM IST

सातारा- तरुणाकडून २५ हजार रुपयांची खडणी उकळल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी वनविभागातील परळीचे वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावलेसह अन्य दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार शिंदे (पिरेवाडी (भैरवगड) ता.सातारा) हा नुकसान करणाऱ्या माकडांना हाकलण्यासाठी शेतात गेला होता. तेथे परळीचे वनपाल योगेश गावित, वनरक्षक महेश सोनावले व अज्ञात दोघांनी त्याला पकडले. वनपाल गावित यांनी ओंकारला कारमधून साताराकडे आणले. वाटेत गावितने कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो, असेही धमकावले. तसेच, रात्रीच्या सुमारास साताऱ्यातील गोडोली नर्सरीत डांबून दांडक्याने ओंकारला मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला खिंडवाडी येथे महामार्गानजिक असलेल्या एका लॉजवर नेऊन पुन्हा डांबून ठेवण्यात आले.

रात्री उशिरा ओंकारचे वडील शामराव शिंदे, अमोल गायकवाड, सोनावले व एक अनोळखी व्यक्ती असे त्या लॉजवर गेले. तेथे वडिलांच्या व अमोल गायकवाडच्या सह्या घेत दुसऱ्या दिवशी ३० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी शामराव शिंदे यांनी २५ हजार रुपये दिल्यानंतर ओंकारची सुटका करण्यात आली, असे ओंकार शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. बोरगाव पोलिसांनी याबाबत दोन्ही वनकर्मचाऱ्यांसह अज्ञात दोघांवर खडणीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा- सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या उल्लंघन प्रकरणी कराडमध्ये ४१ हजाराचा दंड वसूल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.