ETV Bharat / state

निसराळे येथे बैलगाडी शर्यत भरविल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा; कारवाईत महिला फौजदार जखमी - सातारा लेटेस्ट न्यूज

गुरुवारी सकाळी निसराळे येथे बेलदार वस्तीजवळ बैलगाड्यांच्या शर्यती सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. पोलिसांना पाहताच पळापळ सुरू झाली. यावेळी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले.

Breaking News
author img

By

Published : Aug 28, 2020, 9:45 AM IST

सातारा - कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम न करण्याचे व सार्वजनिकरित्या जमून खेळ न करण्याचेही नियम घालून देण्यात आले आहे. मात्र, हे आदेश झुगारून निसराळे येथे बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या सात जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई करतेवेळी महिला पोलीस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करून त्यांना जखमी केल्याचे समोर आले. याप्रकरणी यातीलच एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलिसांनी तीन बैल, तीन दुचाकी व दोन पीकअप गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. अमोल शंकर शिंदे (वय २७,रा चरेगाव, ता.कराड), जालिंदर लक्ष्मण भोसले (वय.४०, रा. शेंद्रे), सागर मंगेश पवार (वय २४), गौरव रणजित पवार (वय १९), विश्वनाथ पांडुरंग पवार(वय १८), राहुल शिवाजी पवार (वय ३१) व कुलदीप विनायक पवार (वय.२७, सर्व रा. वर्णे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी निसराळे येथे बेलदार वस्तीजवळ बैलगाड्यांच्या शर्यती सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. यावेळी उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच पळापळ सुरू झाली. यावेळी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात घेत असताना त्यापैकी सागर मंगेश पवार हा त्याच्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी त्याची दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला. सागर पवार याने ढकलून दिल्याने वर्षा डाळींबकर जखमी झाल्या. इतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी सागर पवार याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा व त्याच्यासह अन्य सर्व संशयितांवर भा.द.वि. कलम ३३२, १८८, २६९, २७०, २७१, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र कोविड १९ अधिसूचना नियम ११, साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ ( एल)(सी)(जी)(एन) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.