सांगली - भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवेशबंदीवरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीची ही तालिबानी वृत्ती चालू देणार नाही, तसेच किरीट सोमैया यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर राज्यातील आघाडी सरकार बरखास्त झालेले दिसेल, आणि दादागिरीचे उत्तर दादागिरीने दिले जाईल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे, ते इस्लामपूर मध्ये बोलत होते.
सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला इशारा किरीट सोमैया यांना कोल्हापूर जिल्हा बंदी !ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकारण तापलेला असतानाच रविवारी रात्री किरीट सोमैया कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर निघाले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरीट सोमय्या यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संभाव्य गदारोळाची स्थिती टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैया यांनी जिल्ह्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली. मात्र किरीट सोमैया हे कोल्हापूरकडे महालक्ष्मी एक्सप्रेसने रवाना झाले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी कराडमध्येच स्थानबद्ध केले आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी रविवारी रात्री महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
मग दादागिरीला उत्तर दादागिरीने-हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करून त्या आरोपानुसार आर्थिक गैरव्यवहाराची सखोल माहिती घेण्याकरीता सोमैया आज कोल्हापुरात येणार होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या इशार्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. याबाबत आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया कोल्हापूरकडे रवाना झाले असताना. त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. मग महाविकास आघाडी सरकार हे राज्य गुंडांची टोळी म्हणून चालवत आहे का ? अशा तालिबानी वृत्ती राज्यात चालु देणार नाही, लोकशाहीमध्ये कोणाला कोठेही जाण्याचा अधिकार आहे, आणि कर नाही तर डर कशाला? त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लक्षात ठेवावे, किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला, तर त्याच क्षणी राज्यातील आघाडी सरकार बरखास्त झालेले असेल, त्याच बरोबर दादागिरीला दादागिरीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहेहेही वाचा -
LIVE : भाजप नेते किरीट सोमैया यांना कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी घेतले ताब्यातहेही वाचा - कोल्हापुरात सोमैय्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; पायताण घेऊन स्वागत करण्याचा दिला इशारा