सातारा - आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आहे. मात्र, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचे आहे, आणि त्याविरुद्ध लढा सुरूच राहील, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच हा लढा यशस्वी व्हावा, यासाठी त्यांनी बाप्पाकडे मागणी केली. व राज्यातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. चव्हाण यांनी देखील आज आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले. गणेशोत्सव हा सर्व समाजांना बांधणारा उत्सव आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्ह्यातील अनेक मोठ्या मंडळांच्या मूर्ती स्थापना रात्री उशिरापर्यंत होणार आहेत. तर काही ठिकाणी मुर्ती स्थापन झाल्या आहेत. बुद्धी देवता म्हणून ओळखल्या जाणाऱया आपल्या लाडक्या गणेशाला मोठया थाटा आपल्या घरी घेऊन पूजा केली जात आहे.